scorecardresearch

Premium

हंबरून वासराले चाटती जवा गाय! स्वत: उन्हात उभी राहून वासराला देतेय सावली, हृदयस्पर्शी Video व्हायरल

Viral video: माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते.

viral video of cow seen love her calf video
गाय आणि वासराचा हृदयस्पर्शी Video व्हायरल

हंबरून वासराले चाटती जवा गाय तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय दिसती माझी माय! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. कारण सध्या सोशल मीडियावर एका गाईचा आणि वासराचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. मग ती माणसांची आई असो किंवा प्राण्यांची, आई ही आईच असते. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सध्या उन्हाळा सुरु आहे, बाहेर पडताना आपणही दहा वेळा विचार करतो. जरा ऊन असेल तर घरात थांबणे पसंत करतो, उकडायला लागलं की लगेच एसी फॅन सुरु करतो. मात्र हेच आपण कधी प्राण्यांचा विचार केलाय का? असाच एख व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये दुपारच्या भर उन्हात बिचारं वासरु सावली शोधत आहे. जसं आपल्या आईला आपल्याला काय हवं नको ते लगेच कळतं तसंच प्राण्यांच्या आईलाही कळतं हेच या व्हिडीओतून पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गाय आपल्या वासराला सावली मिळण्यासाठी भर उन्हात उभी आहे. आपल्या आईच्या सावलीत हे वासरुही निवांत झोपलं आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: शार्कचा कपलवर भयानक हल्ला! बॉयफ्रेंडचे लचके तोडले, गर्लफ्रेंड मात्र बचावली

यानंतर एक व्यक्ती येतो आणि वासराला उचलून घेऊन जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×