Viral video: सासू- सुनेचं नातं म्हटलं की सर्वांना आठवतं ते म्हणजे कडाक्याचं भांडण. अनेकदा या नात्यात खटके उडतात तर अनेकदा जोरदार भांडणही होतात. सोशल मीडियावर बऱ्याचदा या नात्याबद्दले अनेक गमतीदार किस्से दाखवणारे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ काहीसा अनोखा आहे, ज्यात चक्क सासू-सुनेचा तुम्हाला धम्माकेदार डान्स पाहण्यासाठी मिळत आहे.

लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू जर ढाँसू निघाली तर…

सध्या एका सूनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. पण हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल, नेमकं काय केलंय यात सूनेने जाणून घ्या…

व्हायरल व्हिडीओ ( Viral Video)

सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओत मनासारखी सासू मिळाल्याने सूनेचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचं दिसून येतंय. आपल्या सासूसमोरच ती अगदी बिनधान्स डान्स करताना दिसतेय. एवढंच नाही तर हातात झाडू घेऊन ही सून ठेका धरताना दिसतेय. तिला पाहून सासूचं हसूदेखील आवरेनासं होतं.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @its_ishuu2003 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.६ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “मनासारखी सासू भेटल्यावर” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “देवाचे आभार माना आईसारखी सासू भेटली. नाहीतर इतरांना भेटत नाही”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “नशीब खूप चांगलं आहे तुमचं”, तर तिसऱ्याने “खूप छान आणि खुश रहा, तू खूप नशिबवान आहेस” अशी कमेंट केली. तर “मलापण अशीच सासू भेटूदे” अशी एकीने कमेंट केली.