Viral Video : जगभरामध्ये जुगाड करणाऱ्यांची कमतरता नाही. जुगाड करून हे लोक काय बनवतील याचा काही नेम नाही. ‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हणतात पण कित्येकवेळा असे शोध देखील पाहायला मिळतात जे पाहून लोकांना चक्रावून सोडतात. असाच एक जुगाड पाहून तुम्ही थक्क व्हालं. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एका कारच्या आजुबाजूने लोखंडाची फ्रेम लावल्याचे दिसते आहे. ही विचित्र कार लोक टक लावून पाहताना दिसत आहे पण नक्की हा जुगाड कशासाठी केला आहे लोकांना समजत नाही.
देसी जुगाडने लोकांचे लक्ष वेधून घेतले
बाजारात एकापेक्षा एक कार येत असतात, ज्या कधी आपल्या वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांचे लक्ष स्वत:कडे खेचतात तर कधी किंमतींमुळे. यामध्ये महागड्या गाड्यांना स्कॅच आणि डेंटपासून वाचविण्यासाठी लोक काय काय करत नाही. पण नुकताच एका व्यक्तीने या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधला आहे तेही देशी जुगाड वापरून. असा जुगाड नक्कीच तुम्ही कधीही पाहिला नसेल. एका व्यक्तीने देशी जुगाड वापरून सेल्फ मेड फाइव्ह स्टार कार तयार केली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने त्या व्यक्तीने कारच्या आजुबाजूला अॅक्टिव्हासारखी सेफ्टी फ्रेम लावली आहे, जे पाहून तुम्ही आवाक् व्हाल.
हेही वाचा – नवरदेव होऊन घोड्यावर बसला एलॉन मस्क? शेरवानी लूक होतोय व्हायरल, पाहा फोटो
कारला लावले आगळा वेगळा सेफ्टी फ्रेम
थक्क करणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे रस्त्यावरून जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची नव्या कोऱ्या कारकडे प्रत्येकजण थक्क होऊन पाहत आहे. कारच्या मालकाने गाडीची सुरक्षितता लक्षात घेता एक खास प्रकारची फ्रेम तयार करून लावली आहे. ही फ्रेम पाहून तुम्हाला स्कूटीवर लावली जाणारी सेफ्टी फ्रेम आठवेल. कारच्या वरच्या बाजूला लोखंडाची फ्रेम लावल्याचे दिसत आहे, जे पाहून असा दावा केला जात आहे की ही फ्रेम कारला बसवून घेतली आहे. कारच्या सेफ्टीसाठी कदाचित ही फ्रेम लावली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे पण हा जुगाड कितपत यशस्वी ठरला आहे हे सांगता येत नाही.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या मजेदार प्रतिक्रिया
हा व्हिडिओ युट्युबर प्रतिक सिंह नावाच्या व्यक्तीने २८ मे २०२३ ला शेअर केले होते जो अनेकांना पाहिला आणि शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये प्रतिकने लिहिले आहे की, भारताची पहिली सेल्फ मेड फाइव्ह स्टार कार, फक्त ५५ सेंकद हा व्हिडिओ पाहून लोकांनी एकापेक्षा एक प्रतिक्रिया दिल्या आहेत.