Viral Video of Dog accident in Karnataka: सोशल मीडियावर अनेकदा अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यातले काही व्हिडीओ पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. रस्त्यावरील अपघातांच्या घटना आपल्याला काही नवीन नाहीत. त्यात माणसांसह अनेक प्राण्यांचेही अपघात होताना आपल्याला दिसतात आणि अशात अनेकदा मुक्या जनावरांचा जीवही जातो.

रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात श्वानाच्या लहानग्या पिल्लावरून एका दुचाकीस्वारानं दुचाकी नेली आणि त्याला चिरडलं.

Success Story of Ramlal Bhoi
Success Story : वयाच्या ११ व्या वर्षी लग्न, घरच्यांचा शिक्षणाला विरोध; वाचा हार न मानता NEET मध्ये बाजी मारणाऱ्या रामलालची यशोगाथा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Punjab Viral Video
Punjab Viral Video : धक्कादायक! फोनसाठी चोरट्यांनी तरुणीला नेलं फरफटत, घटनेचा Video व्हायरल
muslim man attacked for allegedly selling beef
Bihar Crime News : गोमांस विकल्याच्या संशयावरून मुस्लीम व्यक्तिला मारहाण; १९ जणांवर गुन्हा, दोघांना अटक
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?
Youth dies in dog attack Mumbai news
मुंबई: श्वानाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
uttarakhand police news cow meat
Cow Meat Smuggling Suspect Died: …आणि जमावानं पोलिसांची आख्खी तुकडीच ठेवली ओलीस, केली धक्काबुक्की; उत्तराखंडमध्ये गोमांस तस्करीच्या आरोपावरून जमाव संतप्त!
raped on dog up
Animal Cruelty on Dog: विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हायरल व्हिडीओनंतर आरोपीला अटक

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of Dog accident)

कर्नाटकातील एक धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत श्वानाचं एक लहानगं पिल्लू रस्ता ओलांडताना दिसतंय. तेवढ्यात एक दुचाकीस्वार त्या श्वानाला रस्ता ओलांडताना पाहूनदेखील ब्रेकवर नियंत्रण ठेवू शकला नाही. ते पिल्लू अचानक समोर आल्यानं दुचाकीस्वार गडबडला आणि त्याला दुचाकीस्वारानं धडक दिली. त्या पिल्लाला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार पुढे जाऊन थांबला. पण, या अपघातामुळे त्या पिल्लाला होणाऱ्या असह्य वेदनांमुळे ते कळवळत असल्याचे आपण या व्हिडीओत पाहू शकतो.

हेही वाचा… डान्स VIDEO शूट करताना मागून हवेच्या वेगाने आली बाईक अन्…, पुढे तरुणीबरोबर ‘जे’ काही घडलं ‘ते’ पाहून व्हाल थक्क

या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेथे रहदारी असून, श्वानाचं पिल्लू रस्ता पार करण्यात अयशस्वी ठरतं आणि अपघातात सापडतं.

या व्हिडीओमध्ये दुचाकीस्वाराला त्याच्या बाईकवर नियंत्रण ठेवायला जमलं नाही आणि रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लाला त्यानं उडवलं. दुचाकी पुढे जाण्यापूर्वी पिल्लू आणि दुचाकी यांच्यामध्ये कमी अंतर राहिल्यानं घटनेदरम्यान ते पिल्लू चाकाखाली चिरडलं गेलं आणि फेकलं गेलं. ते पिल्लू रस्त्यावर फेकलं गेल्यानंतर दुचाकीस्वारानं दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली आणि त्यावर बसलेले तिघे जण उतरले आणि श्वानाजवळ येऊन थांबले. तितक्यात आजूबाजूल्या जमलेल्या गर्दीनं त्या पिल्लाला रस्त्यावरून उचलून कडेला नेलं.

हेही वाचा… …अन् अचानक खचला रस्ता, मधोमध पडलं भलमोठं भगदाड; VIRAL VIDEO नेमका कुठला?

तसंच या दुचाकीस्वाराकडून दुचाकीवरून हेल्मेटशिवाय प्रवास, श्वानाला अपघात, एका बाईकवरून तिघांचा प्रवास अशा प्रकारच्या अनेक नियमांचं उल्लंघन झालं आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ NaNu Watching या एक्स अकाउंटवरून व्हायरल झाला आहे. “बेंगळुरूच्या रस्त्यावर भीषण अपघात, श्वानाचे पिल्लू चाकाखाली आले”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होतात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं तिथल्या स्थानिक पोलिसांना टॅग करून लिहिलं, “कृपया करून हे प्रकरण एकदा पाहून घ्या.” एकानं कमेंट करीत लिहिलं, “श्वानाबरोबर खूप वाईट झालं. दुचाकीस्वारानं अंदाज घेऊन गाडी थांबवायला हवी होती.”