Viral Video: साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला सण म्हणजे गुढीपाडवा. यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणेच मोठ्या जल्लोषात साजरा झाला. ठिकठिकाणी शोभायात्रा, ढोल वादन, लेझिम, वेगवेगळ्या कलांचं प्रदर्शन सादर करण्यात आलं.

महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या सोशल मीडियावर गुढी उभारण्यापासून, शोभायत्रेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातच एका वृद्ध महिलेचा शोभायत्रेतील जबरदस्त असा व्हिडीओ जोरदार व्हायरल आहे. या व्हिडीओत या वृद्ध महिलेने नेमकं काय केलंय ते जाणून घेऊ या…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला महिलेचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील नक्कीच कौतुक कराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये गिरगावमधील शोभायात्रेत अनेक महिला झांज वाजवून त्यांची कला सादर करताना दिसत आहे. यात महिलांच्या ग्रुपमध्ये एक वृद्ध महिलादेखील सहभागी झाली आहे. असं म्हणतात ना वयाला कसलंच बंधन नसतं हेच या महिलेने खरं करून दाखवलं आहे. गुढीपाडव्याच्या या शुभ सणादिवशी ही महिला सुंदर झांज वाजवत शोभायात्रेत सहभागी झाली आहे. ही कला जोपासताना या महिलेच्या चेहऱ्यावर जबरदस्त उत्साह, आनंद आणि जल्लोष दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @thevibecollector_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘नाद जिवंत असेल तर वय कधीच अडवत नाही’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला १४९k व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

गिरगाव शोभायात्रेतील महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “नादाला वयाची मर्यादा नसते”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “मराठ्याची जात आहे वाघिणीसारखी”. एकाने, “खूप सुंदर”, अशी कमेंट केली. तर एकाने “शेवटी आयुष्यात नाद पाहिजे ओ” अशी कमेंट केली.