scorecardresearch

Viral : लहानशा दरवाज्यातून निघण्यासाठी हत्तीने वापरली ही युक्ती, पाहा व्हिडिओ..

पर्यटकांच्या गाडीवर हत्ती धावून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, शांत चित्त असताना हत्ती गोंडस वाटतात आणि आपल्या कृत्याने हसवतात देखील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral : लहानशा दरवाज्यातून निघण्यासाठी हत्तीने वापरली ही युक्ती, पाहा व्हिडिओ..
हत्ती

हल्ली हत्तीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहेत. हत्ती हे विशालकाय असून ते गोंडस दिसतात. लहान हत्तीचा तर लाडच करावासा वाटतो. हत्ती हे तसे शांत दिसतात मात्र काही परिस्थितीत ते रागावल्याचेही दिसून आले आहे. पर्यटकांच्या गाडीवर हत्ती धावून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, शांत चित्त असताना हत्ती गोंडस वाटतात आणि आपल्या कृत्याने हसवतात देखील. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी हत्तीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे. यात हत्तीला एक लहानशा दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. विशालकाय हत्ती लहानशा दरवाज्यातून निघण्यासाठी धडपड करत आहे. आकाराने मोठा असल्याने त्याला दरवाज्यातून बाहेर निघणे कठीण जात आहे.

(Viral : हैदराबादमध्ये मुलांची सुरक्षा धाब्यावर, चालत्या कारच्या उघड्या डिक्कीत दिसले चिमुकले, पाहा व्हिडिओ..)

इमारती बाहेर निघताना हत्ती त्याच्या आकारापेक्षाही कमी उंचीच्या दरवाज्यातून बाहेर पडू पाहत आहे. एवढा मोठा प्राणी या छोट्या प्रवेशद्वारातून बाहेर पडेल असे वाटत नाही, मात्र हत्तीने प्रयत्न करत ते शक्य केले. आधी हत्ती दरवाज्यात अडकल्याचे दिसून येते. मात्र हत्ती खाली झुकून पुढे येत दरवाज्यातून सावकाश बाहेर आपले विशालकाय शरीर काढत असल्याचे व्हिडिओत दिसते.

आवडत्या वस्तूंचा विषय असतो तेव्हा हत्तीसमोर अशा अडचणी काही मोठी बाब नसतात. अन्न खालल्यानंतर हत्ती एका इमारतीबाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. हत्तींना दूर अंतरावरील गंध येतो, असे सुसांता यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

यावर नेटकऱ्यांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. व्हिडिओवर युजरनी विनोदी कमेंट्स केल्या आहेत. गजराज सर्व शिक्षा अभियान आणि मिड डे मिल्स गांभीर्याने घेत आहे, असे एका युजरने कमेंट केले, तर एकाने हत्तीला हुशार आणि नम्र असे संबोधत त्याचे कौतुक केले आहे. तर एकाने हत्तीला पृथ्वीवरील क्युटेस्ट प्राणी असल्याचे म्हटले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या