Viral Video: भारतातील लोकांसाठी जसं इंग्रजी किंवा इतर देशांची भाषा बोलणं कठीण असतं, तसंच परदेशी लोकांसाठी हिंदी बोलणं आणि समजणं अवघड असतं. सध्या सोशल मीडियावर अशाच एका परदेशी महिलेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती अगदी सोप्या पद्धतीने हिंदी बोलण्याची आणि समजून घेण्याची ट्रिक सांगताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी कोणाचा अनुभव, तर कधी कोणाचा सल्ला लोकांचं लक्ष वेधून घेतो. इंटरनेट अशा रील्स आणि व्हिडीओंनी भरलेलं आहे. दररोज इथे काही ना काही नवीन चर्चेत असतं. असाच एका परदेशी महिलेचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये ती परदेशी लोकांना हिंदी बोलण्याची एक सोपी ट्रिक सांगताना दिसते.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक परदेशी महिला सांगते की हिंदी बोलणं इतकं कठीण नाही. तुम्हाला फक्त एक शब्द बोलायला शिकायचा आहे. त्यानंतर ती सांगते की हिंदीमध्ये एक शब्द आहे- ‘अच्छा’, आणि प्रत्येक मूडसाठी हा एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो.
त्यानंतर ती उदाहरण देत ‘अच्छा’ हा शब्द वेगवेगळ्या अंदाजात कसा वापरतात हे सांगते. तिच्या म्हणण्यानुसार, याचा अर्थ ‘गुड’ असतो. जेव्हा तुम्हाला good म्हणायचं असेल तेव्हा ‘अच्छा’ बोला, ok म्हणायचं असेल तरी ‘अच्छा’ चालतं. Really साठीही ‘अच्छा’ वापरता येतं. I see साठीही ‘अच्छा’ वापरलं जातं. I understand, let me think… अशा अनेक गोष्टींसाठी फक्त ‘अच्छा’ हा एकच शब्द वापरून हिंदीमध्ये संवाद साधता येतो.
अशा प्रकारे या परदेशी महिलेने हिंदीतील फक्त एका शब्दाच्या मदतीने सहज हिंदी बोलण्याची ट्रिक सांगितली. तिचं म्हणणं होतं की हिंदी बोलणं अजिबात कठीण नाही. फक्त काही शब्द योग्य पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे वापरता आले पाहिजेत.
इंस्टाग्रामच्या @thelanguageblondie या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक खूप मजेशीर कमेंट्स करत आहेत. काही यूजर्सनी या महिलेला पीके चित्रपटातील अभिनेत्रीची बहीण म्हटलं. तर काहींनी लिहिलं की आम्हीही पीके चित्रपट पाहिला आहे. अनेक यूजर्सनी ‘अच्छा’ लिहून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
