Viral Video Shows Woman Assaulting Policeman : लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. त्यात एक महिला, पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसून येते आहे. व्हिडीओमध्ये पुढे एक व्यक्ती त्याच पोलिसाला मारहाण करताना दिसते आहे. असा दावा केला जात होता की, हा व्हिडीओ कर्नाटकमधील आहे. काँग्रेसशासित या राज्यात एका विशिष्ट समुदायाचे लोक एका पोलिस कर्मचाऱ्याला चालान जारी केल्यानंतर मारहाण करीत होते. परंतु, व्हिडीओचे नेमके सत्य काय? हा व्हिडीओ कर्नाटकमधला आहे की आणखीन कुठला ते बातमीतून जाणून घेऊ या…
नक्की काय होत आहे व्हायरल ? (Viral Video)
एक्स (ट्विटर) युजर @Sandeep_chhote याने दिशाभूल करणारा दावा करून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘कर्नाटक बातम्या! काँग्रेसशासित कर्नाटक राज्यात पोलिसांनी चालान जारी केल्यावर मुस्लिमांनी त्यांना मारहाण केली. हे थेट कायद्यालाच आव्हान आहे. भविष्यात भारतात काय घडणार आहे, देश कोण चालवणार आहे आणि प्रत्येकाचे भविष्य काय असेल’, असे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे.
https://twitter.com/maheshyagyasain/status/1840724306189295689
या दाव्याचे अर्काइव्ह व्हर्जन बघा.
इतर वापरकर्तेदेखील हाच दावा करीत व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास : व्हायरल व्हिडीओमधून (Viral Video) मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही तपास सुरू केला. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, २०१२ मध्येदेखील हा व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह मोठ्या प्रमाणावर शेअर केला गेला होता.
https://twitter.com/gagangoyal1968/status/1352126333854224384
आम्हाला आढळले की, बरेली पोलिस एक्स हॅण्डलने व्हिडीओवर कमेंट केली होती की, हा व्हिडीओ गाझियाबादचा आहे.
आम्हाला jagran.com वर एक बातमी मिळाली. महिलेने पोलिस कर्मचाऱ्याला का मारहाण केली हे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-policeman-publicly-beaten-up-by-lady-18358826.html?_x_tr_hist=true
रिपोर्टमध्ये म्हटले आहे : गाझियाबादमध्ये एका महिलेने पीआरव्हीवर (PRV) तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी चप्पलने मारहाण केली. पीआरव्हीवर उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, ते संतप्त महिलेच्या हातातून पोलीस कर्मचाऱ्याला सोडवू शकले नाहीत. पीआरव्हीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याआधी महिलेच्या मुलाला विनाकारण मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून त्याची आईही तेथे पोहोचली. तिने पोलिस कर्मचाऱ्याला आपल्या मुलाला मारहाण करण्याचे कारण विचारले; मात्र तो काहीच सांगू शकला नाही.
तर इतर बातम्यांमध्ये महिलेच्या भावाला मारहाण झाल्याचा उल्लेख आहे.
https://www.india.com/news/india/ghaziabad-woman-thrashes-constable-with-slippers-for-slapping-her-brother-3259987/
आम्हाला २०१८ मधील एक्स (ट्विटर) अकाउंटवरील गाझियाबाद पोलिसांची पोस्टदेखील सापडली; ज्यात पोलीस अधिकाऱ्यांनी व्हिडीओमार्फत माहिती दिली आहे.
निष्कर्ष : गाझियाबादमधील २०१८ चा हा व्हिडीओ कर्नाटकातील अलीकडील व्हिडीओ असल्याचे सांगून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे या घटनेमागे कोणताही जातीय दृष्टिकोन नाही.