Viral Video of girl using garbage bags prevent from rain: महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून पावसाने महाराष्ट्रात हाहा:कार माजवला आहे. ठिकठिकाणी पाणी भरलेलं असल्याने काही शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच मुंबई आणि पुण्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे रेल्वे सेवा आणि वाहतुक ठप्प झाली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशातच या धो धो वाहणाऱ्या पावसामुळे काही भयंकर घटना घडल्या आहेत ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याचबरोबर एक मजेशीर व्हिडीओदेखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हेही वाचा. ऐकावं ते नवलच! डॉक्टरांनी ६० वर्षीय व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून काढला १६ इंचाचा दुधी भोपळा; शस्त्रक्रियेसाठी लागले तब्बल २ तास व्हायरल झालेल्या या मजेशीर व्हिडीओत आपले कपडे न भिजवता तरुणी साचलेल्या पाण्यातून रस्त्याच्या पलीकडे गेली आहे. हा भन्नाट जुगाड पाहून नेटकरीदेखील हैराण झाले आहेत. तरुणीचा हा व्हिडीओ भारतातला नसून परदेशातल आहे असं दिसून येते आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओत पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं दिसतंय. पावसामुळे पाण्याने भरलेल्या या रस्त्यात आपले पाय भिजायला नकोत आणि शूज स्वच्छ राहावेत यासाठी एका तरुणीने भन्नाट जुगाड (Jugaad) केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की तरुणीने चक्क कचऱ्याच्या पिशव्या तिच्या दोन्ही पायात घातल्या आणि त्या पिशव्या हाताने पकडून रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून ती चालत चालत पलीकडे गेली. 'tlatoani_pizzatl' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला २७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले असून ६०० पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. हेही वाचा. Viral Video: पॉवर ऑफ मेकअप! वयोवृद्ध महिलेचं अवघ्या सेकंदात बदलेलं रूप पाहून तुम्हीही व्हाल शॉक हेही वाचा. Spiderman बनून चालत्या गाडीवर स्टंट करणं पडलं महागात; पोलिसांनी पडकलं अन्…, पाहा नक्की काय घडलं! दरम्यान, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान राज्यात अनेक घटना घडत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.