Viral video: सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त डान्स व्हिडिओ तुफान चर्चेत आहे. हा डान्स पाहून नेटकरी अक्षरशः फिदा झाले आहेत. पारंपरिक, जोशपूर्ण स्टेप्स आणि उत्साहानभरलेली एनर्जी या डान्समध्ये ठासून भरलेली आहे. एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग्ज हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटातील गाणं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे खूप व्हायरल होत असून सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे.
सोशल मीडियावर एक कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल. तो ट्रेडिंगमध्ये असेल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून दोन तरुणींचा डान्स हा नेटकऱ्यांना वेड लावतं आहे. काय ती अदा, काय तो नखरा, काय ते डान्स स्टेप्स या तरुणींचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एकादा पाहून पण नेटकऱ्यांचं मन भरतं नाही आहे. ते हा व्हिडीओ वारंवार पाहतं आहेत. आतापर्यंत या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. पण या व्हिडीओचा क्रेझ काही कमी होतं नाहीय. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलींनी सेम साडी नेसली असून, “स्वर्गात आकाशगंगा” या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. या मुलींच्या गृपचं सर्वच कौतुक करत असून त्यांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत.अनेकदा हे डान्स इतके सुंदर असतात की, पाहणाऱ्याचंही अंग आपोआप हलायला लागतं. सध्या अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ deu__05 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “काय ती अदा काय तो डान्स” तर आणखी एकानं, जबरदस्त डान्स केलाय अशी प्रतिक्रिया दिलीय. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी या मुलींचे कौतुक केले आहे.
