Viral Video groom slaps bride: भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्य लग्नसोहळ्याची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. परंतु, एक असंही लग्न आहे जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय आणि याचं व्हायरल होण्यामागचं कारणही तितकंच गंभीर आहे.

लग्न म्हणजे दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचं मिलन. लग्नामुळे कुटुंब एकत्र येतात आणि हा सोहळा एका उत्सवासारखा साजरा करतात. लग्न म्हटलं की गोंधळ, गडबड, धावपळ आलीच. मग लग्नाचा हॉल बूक करण्यापासून ते मेन्यू ठरवेपर्यंत लग्नघरात अगदी दमछाक होते. पण, जर सगळं अगदी निर्विघ्नपणे पार पडलं तर तितकाच आनंदही होतो.

Ganeshostav 2024 shocking video man directly kicked the poor man on the street while he Falling at the feet of Lord Ganesha
“मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” कार्यकर्त्यानं रस्त्यावरच्या गरिबाला थेट लाथेनं उडवलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
police filed Chargesheet against actor Raj Tarun
गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल
anesh visarjan and paigambar jayanti miraj
सांगली : मिरजेत पैगंबर जयंतीची मिरवणूक लांबणीवर, गणेशोत्सव – पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने निर्णय
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार
jaipur kid not leaving kidnapper viral video
Video: चिमुकल्याला लागला अपहरणकर्त्याचा लळा, आई-वडिलांकडेही जाईना; पोलिसांनी सोडवताच रडू लागला!

हेही वाचा… MS DHONI VIRAL POST: “काला फॉर…”, एम. एस धोनीला रंगावरून केलं ट्रोल; नेटकरी म्हणाला, “या कारणामुळेच मुलींना बिहारी…”

पण, एक असं लग्नघर आहे जिथे लग्न लागताच असा विक्षिप्त प्रकार घडला, जो पाहून तुमचाही राग अनावर होईल.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर सध्या एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मुलाकडची मंडळी वधूच्या कुटुंबाला बेदम मारहाण करतात आणि याचं कारण म्हणजे- ‘नॉन व्हेज मेन्यू.’

उत्तर प्रदेशातील देवरिया येथे ११ जुलै रोजी ही विचित्र घटना घडली. या ठिकाणी अभिषेक आणि सुषमाचं लग्न पार पडणार होतं. सगळं अगदी ठरवल्याप्रमाणे झालं होतं. परंतु, दोन्ही कुटुंबाच्या या आनंदाच्या क्षणावर विरजण पडलं आणि अचानक आनंददायी वातावरणाचं रूप एका भयावह मारहाणीत झालं.

हेही वाचा… Viral Video: पायांना बांधले चक्क स्टूल अन्…, पावसाळ्यातील जुगाड पडला भारी; पाण्याखालील रस्त्यावर तोल गेल्याने…

वधूच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांसाठी शाकाहारी मेन्यूची व्यवस्था केली आहे हे कळताच वराच्या कुटुंबीयांनी त्यांच्याकडे मांसाहारी जेवणाची मागणी केली आणि शा‍ब्दिक भांडण सुरू केले. या शा‍ब्दिक भांडणानंतर जेव्हा प्रकरण तापलं, तेव्हा दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद झाले आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचलं.

वराच्या कुटुंबाने वधूच्या कुटुंबाला लाठ्या-काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीनंतर लग्नसोहळा तिथेच थांबवण्यात आला आणि वर त्याच्या कुटुंबीयांसह लग्नस्थळ सोडून तिथून निघून गेला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर वधूच्या कुटुंबीयांनी वरावर पाच लाख रुपये हुंडा घेतल्याचा आरोपही केला.

वधूच्या कुटुंबीयांनी केला खुलासा (Brides Family Statement )

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस तक्रारीत वधूच्या वडिलांनी सांगितलं की, वर अभिषेक, त्याचे वडील सुरेंद्र शर्मा आणि त्याच्या इतर कुटुंबीयांनी लग्नात मासांहार न ठेवल्याने अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. मी आक्षेप घेतल्यानंतर अभिषेक शर्मा, सुरेंद्र शर्मा, रामप्रवेश शर्मा, राजकुमार आणि काही अज्ञात लोकांनी माझ्या कुटुंबाला काठीने तसंच लाथा-बुक्क्याने मारण्यास सुरुवात केली.

हेही वाचा… Viral Video: “रागावतो माझ्यावर बाप माझा, त्याला माहित्येय की..”, दुसऱ्याला आनंद देताना भरउन्हात उभ्या पितापुत्रांचा व्हिडीओ पाहून पाणावतील डोळे

वधूची आई म्हणाली, वरमाला घातल्यानंतर जेव्हा वराने वधूला विचारलं की, जेवणासाठी काय मेनू आहे, यावर वधू म्हणाली, साधच जेवण आहे. यावर वराने वधूच्या कानशि‍लात लगावली आणि तिला म्हणाला की, मेन्यूमध्ये मासे का नाही आहेत. वराच्या कुटुंबीयांनी मला आणि माझ्या पतीलादेखील खूप मारलं. वर पक्षाच्या १० लोकांनी आम्हाला मारहाण केली आणि आमच्या कुटुंबातील सदस्यांना जखमी केले.

व्हायरल व्हिडीओवरील कमेंट्स