Dance Video: सोशल मीडियावर एखादं गाणं व्हायरल झाला की त्यावर डान्स करण्याचा मोह अनेक क्रिएटर्सना होतो. मग अगदी लहानांपासून, मोठ्यांपर्यंत अनेकजण हा ट्रेंड फॉलो करत व्हायरल गाण्यावर थिरकताना दिसतात. तर अनेकदा एखाद्या कार्यक्रमात, समारंभात, हळदीत, लग्नात केलेले डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात तर काही डान्स वादग्रस्तदेखील असतात. अशा या डान्सच्या भोवऱ्यात दररोज काही ना काही नवनवीन पाहायला मिळतं.
सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की रातोरात त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आणि अशा क्रिएटर्सच्या चाहत्यांची संख्याही वाढते.
शेकी शेकी, गुलाबी साडी, सुंदरी सुंदरी अशा गाण्यांनी सगळ्यांना वेड लावणारा प्रसिद्ध गायक संजू राठोड याचं नवीन गाणं आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर अनेकांनी रिल्स शेअर केल्या आहेत. सध्या याच गाण्यावरील एका तरुणीच्या व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Laal Laal Colorchi Bangdi Dance Video)
‘लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल…’ या गाण्यावर ही तरुणी डान्स करताना दिसतेय. अगदी हुबेहुब डान्स स्टेप्स करत तिने सोशल मीडियावर सगळ्यांचं कौतुक मिळवलं आहे. एक्सप्रेशन्स, मोहक अदा आणि सुंदर डान्स करत तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. तिचा मनमोहक डान्स आणि जबरदस्त एनर्जी पाहून संजय राठोडनेही व्हिडीओवर कमेंट केली आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sheetalpayaaaal या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.८ मिलियन व्ह्युज आले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Viral Video Comments)
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जमलाय की”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ट्रेंडसाठी का होईना हातात बांगड्या तरी घातल्या”, तर तिसऱ्याने “झकास, आवडला तुझा डान्स” अशी कमेंट केली. तर “बांगडी कमी तंगडी जास्त दाखवताय” अशी एकीने कमेंट केली.
