गेंड्याला किती भलामोठा, जाडजुड असतो हे तुम्हाला माहितीच आहे. वाघाची शिकार करणे हे सोपे ठरेल, पण गेंड्याची शिकार करणे हे सोपे काम नाही. बिबट्याबद्दल जर बोलायचं झालं तर या प्राण्याला आदिवासी शिकारी म्हणून ओळखलं जातं. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करतो. मात्र, कदाचितच तुम्ही असं कधी पाहिलं असेल की एखादा बिबट्या गेंड्यासोबतच भिडला. अशाच भल्यामोठ्या गेंड्याला एका बिबट्याने अवघ्या काही सेकंदात संपवलं आणि त्याला उचलून सरसर झाडावर चढू लागला. इतक्या मोठ्या गेंड्याला उचलून हा बिबट्या झाडावर सरसर कसा काय चढला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शरीराने गेंड्यापेक्षा कमी असलेल्या बिबट्याने अगदी कागद उचलावा तसा या भल्यामोठ्या गेंड्याला उचललंय. बिबट्या आपले शिकारीचे काम पापणी लवण्याच्या आत पूर्ण करतो. बिबट्या हा सिंहासारखा धोकादायक शिकारी आहे, परंतु सिंहाप्रमाणे तो आपली शिकार जमिनीवर ठेवून खात नाही. निसर्गाने त्याला झाडावर चढण्याचे बळ दिले आहे. जेव्हा जेव्हा बिबट्या एखाद्या प्राण्याची शिकार करतो तेव्हा तो झाडावर चढतो आणि तिथे एकटाच भोजन करतो. जेणेकरुन सिंह, हायना किंवा जंगली कुत्रा यांसारखा भक्षक प्राणी हल्ला करून आपली शिकार पळवून नेऊ शकत नाही.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
health benefits of lauki
तुम्ही उन्हाळ्यात दर आठवड्याला दुधी खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

या व्हिडीओमधल्या बिबट्याने त्याच्या जबड्यात भल्यामोठ्या गेंड्याला पडकून अगदी माकडासारखा वेगाने चढला हे पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. ज्या झाडावर बिबट्या चढला ते झाड अगदी काटीसारखं सरळ होते. तरीही गेंड्याचं इतकं मोठं वजन उचलून हा बिबट्या झाडावर वेगाने चढला. गेंड्याला पाहून असं वाटतंय की बिबट्याने या गेंड्याची शिकार करून त्याचा खात्मा केलेला आहे. त्यानंतर त्याचं मृत शरीर जबड्याने उचलून तो खाण्यासाठी झाडावर चढला आहे.

आणखी वाचा : भुकेल्या मगरीला खाऊ घालत होता अन् अचानक…VIDEO VIRAL पाहून अंगावर येईल काटा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Viral Video : उंटासोबत सेल्फी पडला महागात! घडलं असं काही की महिलेला थेट जमिनीवर आपटलं

हा व्हिडीओ wild animal shorts नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. १२ सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून लोक अवाक झाले आहेत. बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण बिबट्याच्या या खतरनाक शिकारीचा हा व्हिडीओ लोक पहिल्यांदाच पाहात असल्याच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. हा व्हिडीओ वारंवार पाहू लागले आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख २३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

या व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो आहे.’ असं एका युजरने लिहिले आहेत. “मला आज कळलं की बिबट्याला जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी का म्हटलं जातं. या व्हिडीओतील बिबट्याची अप्रतिम शक्ती पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.