Viral video:गावागावात फिरताना दारू आणि दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या कहाण्या पहायला मिळतात. घर पोखरणाऱ्या, कुटंब विस्कटणाऱ्या या व्यसनाच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत.दारूच्या व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळते, घरातील नातेसंबंध तुटतात आणि लहान मुलांचे भविष्य अंधकारमय होते. या व्यसनामुळे अनेकदा गुन्हेगारी वाढून घरातील कर्त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. अशाच एका चिमुकलीचे वडील या दारुमुळे गेले आणि आता ती वडिलांना जाब विचारत असतानाचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये एक छोटी मुलगी आपल्या वडिलांची फोटो फ्रेम पाहतेय. तिच्या डोळ्यांसमोर ही फ्रेम आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर निरागसता आणि दुःख यांचं मिश्रण दिसून येतंय.व्हिडिओमध्ये मुलगी फोटोला बोट दाखवत आपल्या वडिलांना जणू प्रश्न विचारत म्हणते, “आई म्हणायची ना दारू पिऊ नका… तुम्ही का ऐकलं नाही? सगळ्यांचे पप्पा आहेत, मात्र तुम्ही नाही आहात… तुम्ही दारू पिऊन का गेलात? सांगा मला… नाहीतर मी रागावेन.” तिच्या या शब्दांमागे कोणताही राग नसून, वडिलांना परत मिळवण्याची एक निष्पाप आस आहे. तिला अजून पूर्णपणे समजलेलं नाही की तिचे वडील आता परत येणार नाहीत.

दारूमुळे अवघ्या आयुष्याची माती होते. दारूच्या व्यसनामुळे कित्येक घर मोडले आहे. दारूचे व्यसन फार वाईट आहे. घराचा मुख्य माणूसच त्याचा आहारी गेला तर घराचे सर्वनाश होणे निश्चितच आहेच. दारू सोडविण्यासाठी कुटुंबाचा प्रत्येक सदस्य काहीही प्रयत्न करतो. जेणे करून आपल्या माणसाला लागलेली ही दारू पिण्याची वाईट सवय दूर होवो. पण तरीही काहीजण आणखी त्याच्या आहारी जातात आणि पुढे त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.

पाहा व्हिडीओ

आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, थट्टामस्करी करण्याच्या वयात आजही अनेक तरुण नशेच्य आहारी जातात आणि संपूर्ण घर उध्वस्त होतं..याचंच हे एक उदाहरण समोर आलं आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील is58163 या अकाउंटवर शेअर करण्यात आलाय. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.