scorecardresearch

मोठ्या भावाची ही ‘कॅच’ छोट्याला जीवनदान देणारी ठरली! हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

एकीकडे संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठलेल्या भावांच्या घटना घडत असताना या व्हायरल व्हिडीओमधल्या भावांची चर्चा सध्या सुरूये.

Big-Brother-Save-Elder-Brother-Viral-Video
(Photo: Youtube/ Onmanorama)

Man Catches Younger Brother Falling From Terrace : पैशांसाठी आणि संपत्तीसाठी सख्ये भाऊ एकमेकांच्या जिवावर उठत असल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. पण या जगात कुणाचंच कुणी नसतं. आपले आई-वडील, सख्खा भाऊ असे ज्यांच्यासोबत रक्ताचे नाते आहे हीच माणसं आपल्याला अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येतात, हे ही तितकंच खरंय. सध्या याचाच प्रत्यय देणारी एक घटना घडली आहे. साफसफाई करत असताना अचानक इमारतीवरून छोटा भाऊ खाली कोसळला. पण म्हणतात ना, दैव तारी त्याला कोण मारी? खाली उभ्या असलेल्या त्याच्या मोठ्या भावाने आपल्या छोट्या भावाला झेलत त्याचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, भाऊ असावा तर असा!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ केरळमधील मलापुरम जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती पाईपने घर धुताना दिसत आहे. अचानक त्याची नजर वर जाते, तिथे त्याला त्याचा धाकटा भाऊ छतावरून खाली पडताना दिसतो. भावाला पडताना पाहून तो पाईप सोडून सरळ त्याच्या दिशेने धावतो आणि त्याला झेलतो. धाकट्या भावाचे नशीब चांगले की तो थेट मोठ्या भावाच्या हाती लागला. इकडे-तिकडे थोडं जरी झालं असतं तर त्या व्यक्तीचं वाचणं थोडं अवघड होतं.

आणखी वाचा : खासदाराचा न्यूड VIDEO VIRAL, नेता म्हणाले, “हा मॉर्फ केलेला व्हिडीओ, लॅबमध्ये तपासा”

हा व्हिडीओ पाहताना काही सेकंदासाठी श्वास रोखला जातो. हा व्यक्ती वाचला की त्याला कोणती दुखापत झाली, याची भीती मनात येऊ लागते. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर ‘ऑनमनोरमा’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा : चिप्सच्या पाकिटांपासून पिशव्या आणि बरंच काही! पुणेकर महिलांच्या या सुंदर उपक्रमाचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चालत्या गाडीच्या खिडकीतून मुलगी पडली, ड्रायव्हरला कळलंच नाही; पुढे काय झालं? पाहा VIRAL VIDEO

हा धक्कादायक व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे, तर काहींना भावाने नवजीवन दिल्याचे म्हणणे आहे. काही युजर्स तर भाऊ असावा तर असा, असं म्हणताना दिसत आहेत. एकीकडे संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठलेल्या भावांच्या घटना घडत असताना या व्हायरल व्हिडीओमधल्या भावांची घटना पाहून लोक अजूनही रक्ताचं नातं जिवंत आहे, अशी भावना व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of man catches younger brother fell from terrace of house while cleaning prp

ताज्या बातम्या