झणझणीत मिसळीपासून ते चमचमीत पाव भाजीपर्यंतच्या सर्व प्रकारच्या ‘स्ट्रीट फूड’मध्ये टोमॅटो हमखास असतो. कोणत्याही भाजीची ग्रेव्ही असूदे किंवा भरमसाठ तेल घालून बनवलेलं मसाला ऑमलेट, भुर्जी असूदे; बारीक चिरलेला टोमॅटो हा हवाच! आता लहानशा हॉटेलमध्ये, रस्त्यावर हातगाडी लावून खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते दरवेळेस लागेल तसा एकेक टोमॅटो चिरत बसत नाही. त्यांच्याकडे सर्व तयारी आधीच झालेली असते. कांदा, टोमॅटो, कोबी अशा सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून डब्यामध्ये भरून ठेवलेल्या असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाज्या कशा बरं चिरल्या जात असतील? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडलेला असतो. घरी कांदा-टोमॅटो चिरायचे म्हटले की आपण पटकन चॉपिंग मशीन किंवा जरा जास्त सामग्री असल्यास फूड प्रोसेसरचा वापर करतो. परंतु, अशा घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पर्याय या हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडे नसतो.

असे असताना, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून त्यांना त्याची गरज आहे असे मुळीच वाटत नाही. कारण यंत्रांपेक्षा जास्त गतीने एक व्यक्ती एका मिनिटाच्या आत शंभरेक टोमॅटो चिरत असल्याचे आपल्याला व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसते. हे त्याने कसे केले ते पाहू.

हेही वाचा : काय! चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट!! Viral Video मधील ‘ही’ ट्रिक पाहून कपाळावर माराल हात

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @crazy_cook_lover_durga नावाच्या अकाउंटने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला एका प्रचंड मोठ्या आकाराच्या पातेल्यात जवळपास शंभरेक टोमॅटो असल्याचे आपण पाहू शकतो. आता एक व्यक्ती लांब पात्याची सुरी घेऊन, पातेल्यामधील सर्व टोमॅटोवर सपासप चालवतो. त्याच्या हाताच्या गतीने बघता बघता अर्ध्याहून अधिक टोमॅटो चिरले गेलेले आपल्याला दिसतात. आता ती व्यक्ती पातेलं थोडं तिरके करून, उरलेले टोमॅटो पुन्हा त्याच पद्धतीने चिरून घेतो. पाहता-पाहता अगदी एका मिनिटांत सगळे टोमॅटो बारीक चिरलेले आपण पाहू शकतो.

टोमॅटो चिरण्याचा हा भन्नाट व्हिडीओ पाहून त्यावर नेटकरी काय म्हणाले आहेत ते पाहा

“इलेक्ट्रिक मिक्सरपेक्षाही भारी चिरतोय हा व्यक्ती” असे एकाने कौतुक केले आहे. दुसऱ्याने, “मिक्सरचा शोध लागण्यापूर्वी माणसं असे भाज्या चिरायचे” असे लिहिले आहे. तिसऱ्याने, “अरे देवा, असे टोमॅटो चिरले तर त्याबरोबर अळ्यापण खाण्यात येतील ना..” असे लिहिले आहे.

हेही वाचा : शेतकरी आंदोलनाला विरोध करण्यासाठी लोक खरंच उतरले रस्त्यावर? जाणून घ्या ‘या’ Viral video मागील सत्य

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ३४.२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of man cutting huge amount of tomatoes in just a minute went viral watch this video dha
First published on: 23-02-2024 at 19:39 IST