scorecardresearch

VIRAL VIDEO : नियमांची ‘ऐशी तैशी’! थेट बंदूक घेऊन कार्यक्रमात पोहोचला हा व्यक्ती, भरपूर नाचला पण आता….

मोठेपणा मिरवण्यासाठी केलेला हा प्रकार काही वेळेस अनेकांच्या जिवावर देखील बेततो. अशा अनेक घडना घडल्याचं समोर आलं आहे. अशा घटना घडत असताना सुद्धा काही महाभाग अजूनही बंदूक घेऊन मिरवण्याचं धाडस करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे,

gun-shot
(Representational Image)

उत्तर प्रदेशमध्ये नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार हे सतत घडत असतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा घडला आहे. लग्नात बंदुक चालवणं ही जणू परंपराच झाली आहे. काही लोकं आपली शान किंवा श्रीमंती दाखवण्यासाठी लग्नात गोळीबार करतात. मोठेपणा मिरवण्यासाठी केलेला हा प्रकार काही वेळेस अनेकांच्या जिवावर देखील बेततो. अशा अनेक घडना घडल्याचं समोर आलं आहे. अशा घटना घडत असताना सुद्धा काही महाभाग अजूनही बंदूक घेऊन मिरवण्याचं धाडस करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती हातात बंदूक घेऊन मिरवताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या व्यक्ती बराच चर्चेत आलाय.

गावोगावी बहुतेक लग्नसोहळ्यांमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा आयोजित केला जातो. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ हा उत्तर प्रदेशातील महाराजगंज इथला असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हिडीओमध्ये एक ऑर्केस्ट्रा सुरू असल्याचं दिसून येतंय. यात एक तरुण बंदूक घेऊन थिरकताना दिसला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एकाने त्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आणि बघता बघता तो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसही अॅक्शन मोडमध्ये असून या तरुणावर कारवाई करत आहेत.

आणखी वाचा : काश्मीरला गेलेल्या मुलीला ही गोष्ट बघायला मिळालीच नाही, पाहा हा VIRAL VIDEO

कमरेला बंदूक घेऊन नाचतोय
महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दशरथपूर गावात आयोजित केलेल्या लग्नसोहळ्यात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. हा तरूण स्टेजवर एका डान्सरसोबत बंदूक घेऊन डान्स करत असल्याचं दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियाच्या जगात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आता कारवाईची चर्चा करत आहेत. खरं तर रविवारी जिल्ह्यातील निचलौल भागातून जंगलाला लागून असलेल्या दशरथपूर गावात मिरवणूक आली होती. यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा : विशालकाय अजगराने वासरावर केला हल्ला, पुढे काय झालं? पाहा हा VIRAL VIDEO

यावेळी रात्रीच्या वेळी वऱ्हाडी मंडळींसाठी ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी हा व्यक्ती बंदूक घेऊन स्टेजवर चढला आणि डान्सरसोबत थिरकू लागला. गावातील काही लोकांनी त्याचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या व्यक्तीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. पुरंदरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतेंद्र राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण याच गावचा आहे आणि त्याने बनावट बंदूक घेऊन डान्स केला होता. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून त्याच्यावर आज कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of man who dancing with gun at wedding in maharajganj uttar pradesh see what police did after seeing trending video prp