Viral Video: लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी हल्ली वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात. अगदी मेहंदी, संगीत, हळद व लग्न अशा साग्रसंगीत कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यात अनेक ठिकाणी या कार्यक्रमात नातेवाईक-मित्रपरिवार नृत्य सादर करतात, गाणी गातात. तर अगदी डीजे, बॅन्जोही ठेवला जातो. या कार्यक्रमात सगळेच अगदी बेभान होऊन डान्स करतात मजा करतात.
सोशल मीडियावर लग्नसमारंभातील असे अनेक व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. त्यात संगीत, मेहंदी, हळदीतील डान्स परफॉरमन्स तुम्ही पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात मेंहदीच्या कार्यक्रमात एका मावशींनी जबरदस्त डान्स केला आहे.
व्हायरल व्हिडीओ (Mehendi Function Dance Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला मावशींचा हा डान्स पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल. या व्हिडीओमध्ये मेंहदीच्या एका कार्यक्रमात एक मावशी जबरदस्त डान्स करताना दिसतायत. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुदरत’ चित्रपटातील “तुने ओ रंगिले कैसा जादू किया” या गाण्यावर मावशी थिरकताना दिसतायत. मावशींचा इतका उत्साह पाहून अनेकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.
अगदी हटके डान्स स्टेप्स आणि सुंदर हावभाव करत मावशींनी अनेकांचं त्या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतलं. मावशींचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @brownline.mehandi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मावशीने संपूर्ण फंकशनचं स्पॉटलाइट स्वत:कडे घेतलं, तुमच्याकडे आहे का अशी मावशी”, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मावशी आहे हौशी.” तर दुसऱ्याने “किती सुंदर” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “एक नंबर”
दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. अशा व्हिडीओमुळे अनेकांना प्रसिद्धी तर काहींना कला जोपासल्याचा आनंद मिळतो.
