Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा अशा लोकांच्या गोष्टी व्हायरल होतात, जे एकेकाळी खूप श्रीमंत होते, पण आता त्यांची परिस्थिती खूप खराब झाली आहे आणि ते रस्त्यावरचं जीवन जगत आहेत. सध्या अशाच एका वृद्ध व्यक्तीची गोष्ट व्हायरल होत आहे. हे वृद्ध स्वतःला करोडपती असल्याचं सांगत आहेत, पण सध्या ते रस्त्याच्या कडेला राहत आहेत.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या वृद्ध व्यक्तीचा दावा आहे की, ४० वर्षांपूर्वी ते करोडपती होते. पण लग्नात अपयश आल्यानंतर त्यांना पैसा आणि सगळ्याच गोष्टींचा तिरस्कार वाटू लागला. त्यानंतर ते अशाच परिस्थितीत आयुष्य जगत आहेत.

या वृद्धांचा व्हिडीओ @tarun.mishra17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तरुण मिश्रा हे अनेकदा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना मदत करताना, त्यांच्यावर उपचार करताना किंवा त्यांना जेवण देताना दिसतात. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध व्यक्ती स्वतःची कहाणी सांगताना दिसत आहेत. ते सांगतात की, एक काळ असा होता की ते करोडपती होते, पण आता त्यांना सगळ्याच गोष्टींचा कंटाळा आणि तिरस्कार वाटतो. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला राहण्यास मजबूर झाले आहेत.

त्यांच्या पायावर काही जखमा होत्या, त्यामुळे त्यांना नीट चालताही येत नव्हतं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर हे वृद्ध खूप आनंदी दिसत होते. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व्हिडीओमध्ये जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

यानंतर त्यांना कारमध्ये बसवलं गेलं आणि ते स्वतः कार चालवताना दिसले. यावेळी ते म्हणाले की, कारमध्ये बसल्यानंतर त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले. तसेच, ते खूप वर्षांनी पुन्हा कारमध्ये बसल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी कार चालवली.

या वृद्धांच्या आयुष्यात झालेला बदल पाहून लोक खूप आनंदी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या लोकांचंही कौतुक केलं जात आहे. अनेक जण म्हणत आहेत की, तुम्ही या वृद्धांना पुन्हा जगण्याची नवी आशा दिली आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला ९ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसेच,२४ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे. व्ह्यूजबद्दल बोलायचं झालं तर, हा व्हिडीओ १२ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.