Viral Video: आई आणि मुलगी एकमेकींच्या उत्तम मैत्रीण असतात, ज्या एकमेकींशी मनमोकळेपणाने बोलतात. माय-लेकीचं नातं म्हणजे जणू आईची सावलीच लेक असते. कठीण काळात आई आपली मुलगी आणि मुलगी आपली आई, यांसाठी एकमेकींचा भक्कम आधार बनतात. तर आईची राहून गेलेली हैसही लेकीच पूर्ण करतात. अशाच एका माय-लेकींच्या जोडीचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग्ज हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. काही दिवसांपूर्वी आलेला चित्रपट‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटातील गाणं ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे खूप व्हायरल होत असून सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे.महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अनेकदा यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो. पण, त्यातूनही काही हौशी महिला वेळ काढून आवडीच्या गाण्यावर एखादी रील बनविताना दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये माय-लेकींची जोडी सहभागी झाली आहे. माय लेकीचा डान्स नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. काकूंच्या चेहऱ्यावरील हावभावांनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. माय-लेकी दोघींनी नृत्याचा आनंद घेत आहे. व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडला आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिलांनी सेम साडी नेसली असून, “स्वर्गात आकाशगंगा” या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्या एकदम साध्या, सोप्या आणि सुंदर पद्धतीनं डान्स करीत आहेत. माय-लेकींच्या या जोडीचं सर्वच कौतुक करत असून त्यांच्या साधेपणाचं सोशल मीडियावर युजर्स खूप कौतुक करीत आहेत.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्टाग्रामवरील sakshi_mhaske14या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखाहून अधिक व्ह्युज आणि १० हजाराहून अधिक लोकांच्या लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

