Viral Video : सध्या लग्नाचे सीझन सुरू आहे. सगळीकडे लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नातील, डान्स, गाणी, संगीत किंवा हळदीच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ तसेच उखाणे, गृहप्रवेशासारख्या इतर पारंपारिक प्रथांचे व्हिडीओ चर्चेत येत आहे पण एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका नवरदेव नवरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव ढोलकी वाजवत आहे तर नवरी भजन गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक भजनाचा कार्यक्रम रंगलेला दिसेल. व्हिडीओत तुम्हाला नवरदेव नवरी दिसतील ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहेत. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव खाली बसून ढोलकी वाजवत आहे तर नववधू माइकसमोर उभी राहून भजन गीत गात आहे. व्हिडीओत तुम्हाला काही इतर चिमुकल्या मुली दिसतील ज्या भजन गीत गात आहे. तर काही तरुणी हातात टाळ घेऊन भजनावर ठेका धरताना दिसत आहे. काही लोक आजुबाजूला बसून भजनाच्या तालावर टाळ्या वाजवताना दिसत आहे. हे भक्तीमय वातावरण पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या श्रीक्षेत्र वाल्मीक ऋषी वालझरी येथील आहे. ही नववधू युवा किर्तनकार आणि प्रवचनकार आहे तर नवरदेव सुद्धा युवा किर्तनकार आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
santosh_varade_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात तो हाच का” तर एका युजरने लिहिलेय, “हीच आहे आपली खरी संस्कृती” आणखी एका युजरने लिहिलेय, “साक्षात विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन झाले आहे” एक युजर लिहितो, “महाराष्ट्रीयन संस्कृतीचे आणि दांपत्य साथीचे उत्तम उदाहरण..!! प्रत्यक्ष श्री लक्ष्मी नारायणाचा जोडा..!!” तर एक युजर लिहितो, “अप्रतिम. अध्यात्मिक मार्गात एकमेकांची साथ असणे खुप गरजेचे” आणखी एक युजर लिहितो, “हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी” अनेक युजर्सनी या नव्या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.