सध्या सगळीकडेच कडाक्याची थंड पडलीय. अशातच गरमागरमणि खाद्यपदार्थ खाण्याकडे अनेकांचा ओढा असतो. अगदी कमी वेळेत तयार होणारी मॅगी नुडल्स (Maggi Noodles) हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. मात्र, सध्या याच नुडल्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ गरमागरम नुडल्स खाण्याचा नाही, तर या नुडल्सचा वापर स्वेटरप्रमाणे विनकामासाठी केल्याचा आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हो हे खरं आहे की या व्हिडीओत जसं स्वेटर विणतात त्याचप्रमाणे नुडल्सचं विणकाम दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक महिला नुडल्स शिजवते आणि मग लाकडी ‘चॉपस्टिक्स’ने एक एक नुडल्स घेत त्याचं विनकाम करत आहे. या महिलेच्या विणकामचं हे कसब पाहून सोशल मीडियावर अनेकजण आवाक होत आहेत. तसेच या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत शेअरही करत आहेत. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ६.९ मिलियन म्हणजेच ६९ लाख लोकांनी पाहिलंय. याशिवाय हजारो रिट्विट आणि कमेंटही करण्यात आल्यात.

व्हिडीओ पाहा :

ट्विटरवर @mixiaoz या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ आधी टिकटॉकवर पोस्ट केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. आतापर्यंत ट्विटरवर ३ लाख ७८ हजारहून अधिक लोकांनी या ट्विटला पसंती दिलीय. तसेच ९० हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेक युजर्स या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : स्टंट करण्याच्या नादात तरुणीने कॅमेरामॅनवरच चढवली स्कूटी; Video Viral

कोणी आम्हाला चॉपस्टिक्सने साधे नुडल्सही खाता येत नाही, तुम्ही विणकाम कसं करू शकता असं म्हणत आश्चर्य व्यक्त करतंय, तर कोणी विणलेल्या स्वेटरचे फोटो टाकून मजा घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of noodle handloom like sweater tiktok social media pbs
First published on: 20-01-2022 at 13:42 IST