ऑक्टोपस हा समुद्रातील काही भयनाक आणि हिंसक जलचरांपैकी एक मानला जातो. हा प्राणी समुद्राच्य तळाशी राहातो आणि अन्नासाठी सकाळी किंवा संध्याकाळी समुद्राच्या वरच्या भागात येतो. मोठ्या आकाराच्या ऑक्टोपसला तुम्ही बघितले असेल, मात्र तुम्हाला बेबी ऑक्टोपस देखील आता पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्टोपस एकावेळी इतके अंडे देऊ शकते

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अंड्यातून बेबी ऑक्टोपस बाहेर पडताना दिसून येत आहे. हे दृष्य फार उत्तमरित्या रेकॉर्ड करण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला जाम पसंती दिली आहे. व्हिडिओमध्ये फुलासारखे काहीतरी दिसून येते. यातून बेबी ऑक्टोपस बाहेर पडताना दिसल्यावर हे ऑक्टोपसचे अंडे असल्याचे समजते. अंड्यातून ऑक्टोपस बाहेर पडताच त्याच्या रंगात बदल होताना दिसत आहे. ऑक्टोपस तपकिरी रंगाचा होतो. ऑक्टोपस एकावेळी १०० पेक्षा अधिक अंडे देऊ शकते.

(Magician trick : जादूगारची हातचालाखी पाहून तुम्हीही चक्रावून जाल, खुर्चीवरून कपडा हटवताच बघा काय झाले…)

ओशिन लाइफ नावाच्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. असे व्हिडिओ कदाचित फार कमीच पाहायला मिळतील. अंड्यातून बेबी ऑक्टोपस बाहेर पडतानाचे दृश्य अनेकदा पाहण्याची तुमची इच्छा होईल. आतापर्यंत या व्हिडिओला ४५ हजार ९६२ लाइक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ पसंत पडला आहे आणि तो खूप व्हायरल देखील होत आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओला बघितले आहे.

नेटकरी म्हणाले सो क्यूट..

एका युजरने ऑक्टोपसचे अंड्यातून बाहेर निघण्याला क्यूट असे संबोधले आहे. तर एका युजरने ऑक्टोपसचे अंड्यातून बाहेर निघताच ताबडतोब रंग बदलण्याच्या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. दुसऱ्या एका युजरने सुरुवातीला अंडे आपल्याला फ्लॉवर वाटल्याचे सांगितले. तर एका युजरने हे ऑक्टोपस नसून स्क्विड असल्याचे म्हटले. एकूणच ऑक्टोपसचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of octopus coming out of egg ssb
First published on: 15-09-2022 at 18:01 IST