scorecardresearch

Premium

VIDEO: हृदयद्रावक! बाळासकट आई नाल्यात पडली; माणुसकीने वेळीच एंट्री केल्याने “क्रूर वेळ” टळली

माणुसकी अजूनही जिवंत आहे! हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

Viral Video Of People Rescuing mother and child From water Your Faith In Humanity Watch shocking video
माणुसकी अजूनही जिवंत आहे!

Shocking video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवतात, काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. सध्याच्या स्वार्थी युगात माणुसकी हरवत चालली आहे की काय, असं चित्र दिसून येत होतं. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये या गोष्टीला तिलांजली मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या बाळाला घेऊन नाल्यात पडली. यावेळी “काळ आला होता..वेळ पण आली होती” मात्र माणुसकीने वेळीच एंट्री केल्याने “क्रूर वेळ” टळली अन योग्य वेळी मदत मिळाल्याने माय-लेकींचाजीव वाचला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर लोकांची ये-जा सुरु आहे. यावेळी एका ब्रीजवरुन एक सायकल चालक येताना दिसत आहे. त्याच्याच मागून एक महिलाही सायकलवरुन येताना दिसते, यावेळी सायकलवर ती एकटी नसून तिच्याबरोबर एक लहान बाळही आहे. यादरम्यान अचानक सायकलवरुन महिलेचा तोल जातो आणि ती बाळासकट नाल्यात पडते. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. यानंतर नाल्यात पडलेलं बाळ अचानक दिसेनासं झालं. ती महिलाही नाल्यात पडल्यामुळे तीसुद्धा पुरती घबरली होती. यावेळी बाळही सापडत नव्हते. मात्र आजबाजूला जमलेल्यापैंकी ३ ते ४ जण कशाचाही विचार न करता मदतीसाठी नाल्यात उतरले आणि बाळाला शोधू लागले.

Vipreet Rajyog
‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधदेवाच्या कृपेने वर्षभरात होऊ शकता गडगंज श्रीमंत
mazhi maitrin chaturang marathi news, mazhi maitrin loksatta article marathi
माझी मैत्रीण : मैत्रीतलं चुंबकत्व!
Sharmila Thackeray
शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल, म्हणाल्या “कोविड काळात बंगल्यात…”
If You Skip Sugar Jaggery All Sweets What happens to your body on a no-sugar diet for a year like Kartik Aaryan ft Chandu Champion
वर्षभर साखर न खाल्ल्याने शरीराचं काय बदल होतात? कार्तिक आर्यनचा प्रयोग तुमच्या कामी येणार का?

काही वेळानं हे बाळ सापडलं, तसं त्या बाळाला बाहेर काढलं. त्यानंतर पडलेल्या महिलेलाही लोकांनी बाहेर काढलं.  हा व्हिडीओ पाहताना काळजात धडकी भरते. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> केळी खाताना ‘हा’ डाग आहे का ते नक्की बघा; अन्यथा…काय होऊ शकतं पाहा Video

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @a_munna_bhi या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत. वाचवल्याबद्दल नेटिझन्सनी बचावकर्त्त्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिले, “‘टीमवर्क अशक्य ते शक्य करून दाखवते. देव त्यांना सर्व आशीर्वाद देईल.” या व्हिडीओमध्ये माणुसकीवरचा हरवत चाललेला विश्वास मात्र पुन्हा मजबूत झाला, हे मात्र नक्की

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of people rescuing mother and child from water your faith in humanity watch shocking video srk

First published on: 18-11-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×