अनेक भारतीयांची सकाळची सुरुवात गरमा-गरम चहाने होते. सकाळी चहा प्यायल्याशिवाय त्यांना ताजे-तवाणे वाटतच नाही. काहीजण तर रात्री जेवणाच्या वेळीही चहा पिऊ शकतात. त्यामुळे भारतात अनेकांसाठी चहा म्हणजे एकप्रकारे जीव की प्राण मानला जातो. अगदी १० मिनिटात तयार होणारा चहा पिऊ अगदी तृप्त झाल्यासारखे वाटते. पाणी उकळू त्यात थोडी चहा पावडर, इलायची, आल, साखर आणि सुगंधी मसाले आणि त्यात दूध घालू न एका फक्कड चहाचा आनंद घेता येतो. पण भारतात चहाचेही अनेक प्रकार पाहायला मिळतात. यात अनेक परदेशी ब्राँडचे चहाचे प्रकारही भारतीयांना भुरळ घालत आहेत. पण आपल्यापैकी बहुतेकांनी आल्याचा चहा, मसाला चहा, हर्बल चहा, ग्रीन टी, कॅमोमाइल टी इत्यादीच प्रकार ऐकले असतील किंवा प्यायले असतील. पण चहा प्रेमींसाठी मार्केटमध्ये आता चहाचा एक हटके प्रकार आला आहे, जो रोस्टेड मिल्क टी नावाने ओळखला जात, आहे. या चहाचे वेगळेपण म्हणजे त्याच टाकलेले पदार्थ पाण्यात उकळण्याआधी पॅनमध्ये चक्क भाजून घेतले जात आहेत. त्यामुळे चहाचा हा प्रकार आता OG चहा प्रेमींसाठी एक चर्चेचा विषय बनला आहे. या भन्नाट चहाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.
त्यामुळे तुम्हालाही कधी चहाचा हटके प्रकार पिण्याची इच्छा झाली तर रोस्टेड मिल्क टी पिऊ शकता. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती गॅसवर ठेवलेल्या पॅनमध्ये आधी चहा पावडर, साखर, वेलची पावडर भाजताना दिसत आहे, यावेळी साखर जस जशी गरम होते तसतशी ती हळहळून वितळते आणि इतर पदार्थही त्यात मिसळले जातात. यानंतर त्यात अधिक सावधपणे दूध ओतले जाते. अशाप्रकारे हा चहा तयार केला जातो, यानंतर तो मस्त गकळी येईपर्यंत गरम करुन लगेच सर्व्ह केला जातो. या जरा हटके चहामुळे आता चहा प्रेमींसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. @food_madness__ नावाच्या युजरने या हटके चहाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.




या व्हिडीओवर आता लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. अनेकांनी तर भन्नाट भन्नाट कमेंटस केल्या आहेत. तर अनेक चहा प्रेमींना हा व्हिडीओ अजिबात आवडला नसून त्यावर नाराजी वर्तवली आहे.
एका युजरने लिहिले की, चहाबरोबर असा विनोद खपवून घेतला जाणार नाही. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, चहाची चव खराब करण्याची ही चांगली पद्धत आहे. तर तिसऱ्या एका युजरने लिहिले की, असा चहा कधीही करुन पाहू नका, याची चव खूप वाईट लागते. यावर आणखी एकाने कमेंट करत लिहिले की, मी चहा प्रेमी आहे, कृपया चहाला एकटे सोडा. मी स्वत: हा चहा बनवण्याचा प्रयत्न केला, याची चव खूपच खराब होती, अगदी कडवट… भयानक…. असही एक युजर म्हणाला.