Snake viral video: कल्पना करा, तुम्ही रात्रभर शांत झोपलात, सकाळी आरामात उठलात, आळस झटकलात आणि अंथरुण काढायला घेतलं. आणि त्याच वेळी तुमच्या अंथरुणातून एका विषारी सापाचे तुम्हाला दर्शन झाले. कल्पनेनेच अंगावर काटा उभारला ना…पण ही घटना प्रत्यक्षात घडलीय. अनेकदा जंगल परिसराजवळील घरातून साप आढळून येत असल्याचे पाहिले असेल. हे साप बहुधा काळोख्या आणि कोरड्या ठिकाणी लपून बसलेले असतात. तुम्ही सोशल मीडियावरही घरात साप लपून बसलेले अनेक व्हिडीओ पाहिले असतील. बाईक, कार किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही साप लपून राहू शकतो. या वेळी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवले जाते. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साप अशा ठिकाणी लपून बसला होता ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल.अनेकदा हे साप अशा ठिकाणी लपून बसतात की कोणाला शंकाही येत नाही. अशाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओमध्ये एक विषारी साप हा बेडरुमच्या बेडवर लपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक साप घरात घुसतो, ज्याला पाहून घरातील सर्वजण बाहेर पळतात. मग, सर्पमित्रांना बोलावलं जातं. जेव्हा सर्पमित्र त्याला शोधायला जातात तेव्हा त्यांना बेडरुममधील बेडवरील गादीवर, बिछान्याखाली हा साप सापडतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती बेडवरील गादीखाली तसेच नंतर गादीवर साप बसलेला दिसतो. त्यानंतर तो पलंगाखाली जाऊ लागतो. सध्या हा व्हिडिओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत.

पावसाळा सुरु आहे आणि त्यामुळे हे प्रकार होणारच. त्यातल्या त्यात गावाकडं घराच्या आजूबाजुला हे वाढलंय. त्यात मग पुन्हा दोन दोन दिवस पावसाची रिपरिप. कधी कधी मुसळधार. अशा ह्या पाऊसपाण्यामुळे सापासारखी जनावरं सैरभैर झाली नाही तर नवलच. कोरड्या जागेच्या शोधात ह्या सापांनी घरात घुसखोरी केलीय आणि नेमकं तेच आता धोकादायक झाल्याचं दिसतंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! हरीण तावडीतून असा सुटला की थेट सिंहच तोंडावर आपटला; पाहा VIDEO

आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की झोपायला जाताना काळजी घ्या. या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.