scorecardresearch

Premium

Viral Video: बेडवर झोपण्यासाठी गेला व्यक्ती; विचित्र आवाज आल्याने गादी उचलताच बसला धक्का

Viral video: घरात विषारी साप घुसला, अशा ठिकाणी जाऊन लपला पाहून सारेच हादरले…

Viral Video Of Snake Hiding In House Under Bed In Bedroom Shocking Rescue Video Goes Viral
किंग कोब्रा व्हिडीओ

Snake viral video: अनेकदा जंगल परिसराजवळील घरातून साप आढळून येत असल्याचे पाहिले असेल. हे साप बहुधा काळोख्या आणि कोरड्या ठिकाणी लपून बसलेले असतात. तुम्ही सोशल मीडियावरही घरात साप लपून बसलेले अनेक व्हिडीओ पाहिले असतील. बाईक, कार किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही साप लपून राहू शकतो. या वेळी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलवले जाते. पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये साप अशा ठिकाणी लपून बसला होता ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल.
अनेकदा हे साप अशा ठिकाणी लपून बसतात की कोणाला शंकाही येत नाही. अशाच एका सापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. व्हिडीओमध्ये एक विषारी साप हा बेडरुमच्या बेडवर लपलेला दिसत आहे. हे पाहून अनेकांची भंबेरी उडाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक साप घरात घुसतो, ज्याला पाहून घरातील सर्वजण बाहेर पळतात. मग, सर्पमित्रांना बोलावलं जातं. जेव्हा सर्पमित्र त्याला शोधायला जातात तेव्हा त्यांना बेडरुममधील बेडवरील गादीच्या खाली हा साप सापडतो.

Yoga for Back Paine
पाठदुखीची समस्या सोडत नाही पाठ? ‘या’ एका आसनाने मिळेल फायदा
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
mankind, earth, destruction, earth destruction marathi news
विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरण्याचं शहाणपण मानवजात दाखवेल का?
Mumbai Drunk Men Rob Assault Passenger Misbehaves With Young Girl Force Man To Chant Jai Shri Ram Near Byculla Y-Bridge
आधी लुबाडलं, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला मग ‘जय श्री राम’ म्हणण्यासाठी चक्क..भायखळाच्या पुलावरील भीषण प्रकार

गादीखाली भलामोठा साप

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती बेडवरील गादी उचलताच त्या गादीखाली साप लपून बसलेला दिसतो. त्यानंतर तो पलंगाखाली जाऊ लागतो. सध्या हा व्हिडिओ पाहून युजर्स हैराण झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking Video: खवळलेल्या समुद्रात लाट आली अन् …१० सेकंदात महिलेला घडली आयुष्यभराची अद्दल

आता युझर्सनेही आपले घर तपासण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की झोपायला जाताना काळजी घ्या. या पोस्टवर आता वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of snake hiding in house under bed in bedroom shocking rescue video goes viral srk

First published on: 23-09-2023 at 10:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×