Viral Video of students kissing at a university in Noida: सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल होणं आता काय नवीन नाही. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणं, किस करणं आता अगदी सामान्य झालं आहे. काही लोकं प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी कृत्य करतात, तर काहींच्या नकळत असे व्हिडीओ रेकॉर्ड केले जातात आणि ते व्हायरल होतात आणि व्हायरल झाल्यानंतर त्यांची बदनामी होते ती वेगळीच. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात एका नामांकित विद्यापीठातील दोन विद्यार्थी एकमेकांना किस करताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video of students kissing at a university)

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका नामांकित विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी किस करताना दिसले. माहितीनुसार हा व्हिडीओ गेल्या आठवड्यात या विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने रेकॉर्ड केला होता.

हेही वाचा… माणुसकीचा अंत! दुचाकीस्वाराच्या चाकाखाली चिरडलं श्वानाचं पिल्लू; धक्कादायक VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

हा व्हिडीओ (Viral Video of students kissing at a university) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पालकांनी आणि नागरिकांनी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या महाविद्यालयात असा अश्लील प्रकार घडतो आणि ते यावर डोळेझाक करत आहेत अशी टीका केल्यानंतर, नोएडा पोलिसांनी या व्हिडीओमागील सत्य तपासण्यास सुरुवात केली. तसेच या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असल्याचे ‘जागरण’ या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

व्हायरल झालेल्या या वादग्रस्त व्हिडीओमध्ये एक युवक तरुणीला भिंतीला टेकवून तिला किस करताना दिसत आहे. हा अश्लील प्रकार विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घडला. वर्गात बसलेल्या एका विद्यार्थ्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे.

नेटकऱ्यांचा संताप

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of students kissing at a university) झाल्यानंतर नेटकऱ्यांनी व्हिडीओवर संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “विद्यापीठ नाही, अय्याशीचा अड्डाच बनवला आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “विद्यापीठावर कारवाई केली पाहिजे.” “अतिशय लज्जास्पद!” अशी कमेंट एकाने केली.

हेही वाचा… …अन् अचानक खचला रस्ता, मधोमध पडलं भलमोठं भगदाड; VIRAL VIDEO नेमका कुठला?

तर अनेकांनी रेकॉर्ड करणाऱ्यावर टीका करत राग व्यक्त केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “ज्याने व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, त्याच्यावर आधी कारवाई झाली पाहिजे. पुढच्या वेळेपासून असे कोणाचेही व्हिडीओ बनवणार नाही मग”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “ज्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, त्याने ही अश्लीलता पसरवली आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय त्यांचा प्रायव्हेट क्षण रेकॉर्ड केला आहे, आता बाकीची मुलंदेखील तिचा छळ करतील.”