VIDEO: आयस्क्रीमवाला चकवा देणार इतक्यात चिमुकलीने लढवली अनोखी शक्कल; तुम्हालाही अनावर होईल हसू

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू अनावर होईल

लहान मुले ही फार हट्टी असतात. त्यांना हव्या असलेल्या गोष्टी किंवा वस्तू वेळेवर नाही मिळाल्या की त्यांना प्रचंड राग येतो, ते रडायला सुरुवात करतात. पण काही लहान मुले याला अपवाद असतात. असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिला टर्की आयस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीने आयस्क्रीम दिले नाही म्हणून राग नाही आला तर त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी ती असे काही कृत्य करते ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

आजवर सोशल मीडियावर आपण टर्की आयस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तींचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले आहेत. ज्यामध्ये आयस्क्रीम विकणारी व्यक्ती हातचालाखी करुन समोरच्या व्यक्तीच्या हातातील आयस्क्रीम ज्या प्रकारे काढून घेते ते पाहणे प्रेक्षकांना प्रचंड आवडते. असाच टर्की आयस्क्रीम विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये आयस्क्रीम मिळाले नाही म्हणून त्या चिमुकलीने लढवलेली शक्कल पाहून तुम्हाला हसू अनावर होईल.
आणखी वाचा : हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानला डेट करण्यावर बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आयस्क्रीमवाला त्या चिमुकलीला आयस्क्रीम देतो आणि हातचालाखी करुन ते पुन्हा तिच्याकडून काढून घेतो. त्यानंतर ती लहान मुलगी चिडेल किंवा रडेल असे सर्वांना वाटते. पण झाले उलटेच. त्या मुलीने चक्क डान्स करण्यास सुरुवात केली. ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. आयस्क्रीम विकणारी व्यक्ती देखील तिचा डान्स पाहून तिच्यासोबत डान्स करण्यास सुरुवात करते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of turkey ice cream seller baby girl dance to grab avb

Next Story
OMG: दहा वर्षाच्या मुलीने एका महिन्यात कमवले १ कोटी रुपये; नेटकरी चक्रावले
फोटो गॅलरी