Terrifying Video: सध्या सगळीकडे दिवाळी सण जल्लोषात साजरा केला जातोय. कुठे रांगोळीची आरास तर कुठे फटाक्यांचा धुमधडाका सुरूच आहे. परंतु, अशा या पवित्र सणादरम्यान काही राक्षसरूपी माणसांची निर्घृण कृत्य थांबतच नाहीत.

सध्या सोशल मीडियावर माणुसकीला काळिमा फासणारा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात दोन तरुण श्वानाच्या शेपटीला फटाका बांधताना दिसतायत. या घटनेत प्राणी जखमी झाल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे आणि इंटरनेट वापरकर्ते राक्षसाची ओळख उघड होईपर्यंत व्हिडीओ शेअर करण्याचे आवाहन करत आहेत. श्वानाबरोबर नेमकं घडलं काय आहे, जाणून घेऊ या.

Shocking video of CRPF Jawan Catches Wife Trying To Elope, Thrashes Her Lover In Front Of Crowd At Patna Station
झालं का फिरुन? सीआरपीएफ जवानाने बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं; VIDEO पाहून बसेल धक्का
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
video of school students hugging each other in classroom went viral on social Media obscene video viral
भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न

हेही वाचा… तरुणीने भररस्त्यात सगळ्यांना ‘असं’ करायला सांगितलं की…, लोकांनी दिला बेदम चोप, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण श्वानाच्या शेपटीला फटाके बांधताना आणि नंतर ते फटाके पेटवताना दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला आणखी एक तरुण त्या श्वानाचे कान पकडून त्याला एका जागी बसवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. फटाके पेटवताच दोघे जण श्वानाला सोडून देतात. फटाके फुटताच श्वान घाबरून धावतो. आपला जीव वाचवण्यासाठी श्वान धावत असताना फटाक्यांमधून ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत. निर्दयी तरुणांनी निष्पाप श्वानाला इजा करणारे असे वाईट कृत्य करण्यापासून आवर घालायला हवा होता.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @TheJonyVerma या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अशा बदमाशांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या मुक्या प्राण्याने त्यांचे काय नुकसान केले होते? असाच फटाका त्या तरुणांना लावला पाहिजे, तरच त्यांना त्याची वेदना कळेल. जर हे दोघे कुठेही सापडले तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा”, असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा… “काका ऑन फायर”, फटाका पेटवला अन् चक्क डोक्यावरच ठेवला, काकांबरोबर पुढे काय घडलं? पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून श्वानाच्या शेपटीला फटाके बांधणाऱ्या तरुणांनाही अशीच वागणूक देण्याची मागणी सोशल मीडिया युजर्स करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुक्या प्राण्यांबरोबर असे कृत्य करणे किती गंभीर आहे.” तर दुसऱ्याने “त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी” अशी कमेंट केली. तर PETA इंडियानेदेखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कृपया आमच्या आपत्कालीन क्रमांक 98201 22602 वर आम्हाला कॉल करा आणि घटनेबद्दल तपशीलवार माहिती द्या किंवा तुमचा संपर्क तपशील प्रदान करा, जेणेकरून आम्ही तुमच्याशी संपर्क करू शकू”, असं त्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader