Cab Driver Video Viral : भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. दोन्ही देशांमधून विस्तवही जात नाही. फाळणीच्या जखमा जेव्हापासून आपण सहन करत आहोत तेव्हापासून या सगळ्या गोष्टी घडत आहेतच. बाकी शांती चर्चा किंवा इतर राजकीय चर्चा घडत असतात. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातले संबंध हे अनेकदा टोकाच्या संघर्षाचेच आहेत. अशात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टॅक्सीत बसलेला पाकिस्तानी माणूस त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलताना भारताला शिव्या घालत होता. ज्यानंतर संतापलेल्या टॅक्सी चालकाने ( Cab Driver ) त्या पाकिस्तानी माणसाला खाली उतरवत हाकलून दिलं.
ही घटना कुठे घडली? व्हिडीओत काय?
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत हे दिसतं आहे की कॅब चालक आणि एक महिला यांनी एका माणसाला चांगलंच फैलावर घेतलं आहे. कॅब ड्रायव्हर ( Cab Driver ) म्हणतो मी काहीही सहन करेन पण देशाचा अपमान नाही. कॅब चालकाने दिलेल्या माहितीनुसार हा पाकिस्तानी माणूस त्याच्या गर्लफ्रेंडला सांगत होता दिल्लीत कुणीही सभ्य नाही. त्यानंतर या कॅब चालकाने त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली. तेव्हा पाकिस्तानी माणसाचं म्हणणं या कॅब चालकाने ( Cab Driver ) रेकॉर्ड केलं. राजधानी दिल्लीत ही घटना घडली आहे.
वादावादी सुरु झाली आणि…
पाकिस्तानी माणूस, त्याची गर्लफ्रेंड आणि कॅब ड्रायव्हर ( Cab Driver ) यांच्यात वादावादी सुरु झाली. कारण त्याची गर्लफ्रेंडही ड्रायव्हरलाच अद्वातद्वा बोलू लागली. त्यानंतर या कॅब चालकाने थेट त्याची कॅब थांबवली आणि या दोघांनाही खाली उतरवलं. मी माझी राईड पूर्ण करणार नाही असंही त्याने सांगितलं. भारतीय लोकांना संधीसाधू म्हणतो, असभ्य म्हणतो मी तुला टॅक्सीमध्ये बसू देणार नाही असं हा कॅब चालक (Cab Driver)व्हिडीओत सांगताना दिसतो आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
पांचजन्यने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक या व्हिडीओवर विविध कमेंट करत आहेत. भारतातली मुलगी पाकिस्तानी बॉयफ्रेंडची बाजू कशी काय घेते? असं काहींनी विचारलं. तर एकाने लिहिलं की भारतीयांबाबत जो अपशब्द वापरत होता त्याला उतरवून कॅब चालकाने ( Cab Driver ) चांगलं कृत्य केलं. दिल्लीत फिरायला आला आहात तर फिरा आणि देशात परत जा, भारताबाबत चुकीचं कशाला बोलता? असंही एकाने म्हटलं आहे. एक युजर म्हणतो हा खरा देशभक्त टॅक्सी चालक आहे. त्याने थेट सांगूनच टाकलंय माझ्या देशाबाबत चुकीचं बोलाल तर मी तुम्हाला नेणारच नाही. भारतीय महिला पाकिस्तानी बॉयफ्रेंडची बाजू कशी काय घेते आहे? असंही एका युजरने विचारलं. तर दुसरा युजर म्हणाला की आमच्या देशात येऊन आमच्या देशाबाबत वाईट-साईट बोलाल तर कुणालाही राग येईलच. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे आणि लोक टॅक्सी ड्रायव्हरच्या कृतीचं कौतुक करत आहेत.