Viral video of uncle: सध्या नवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या आनंदात, जल्लोषात साजरा केला जातो. यंदा ३ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. गुजरात, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या स्वरूपात गरब्याचे आयोजन केले जातेय. लहानशा गावांमध्येदेखील अतिशय उत्साहाने गरबा खेळला जातो आणि देवीची पूजा केली जाते.

नवरात्रोत्सवात आकर्षण ठरणारा गरबा खेळण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. अगदी लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच आवडीने गरबा खेळतात. दरवर्षी वेगवेगळ्या स्टेप्स बसवून आपल्या अंदाजात गरबा खेळतात. यादरम्यान, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक काका अगदी जोशात गरबा खेळताना दिसतायत.

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little Brother ears were pierced video viral
Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Bigg Boss Marathi Season 5 fame irina rudakova dance on Nagada Sang Dhol song
Video: “गरबा संपला ताई…”, इरिनाचा ‘नगाडा संग ढोल’वरील डान्स पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, उत्तर देत म्हणाली, “हो मला…”
uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
Emotional Wedding Video
वेड्या बहिणीची वेडी ही माया! बहि‍णीला हळद लावताना ढसा ढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना

हेही वाचा… “एका मुलीसाठी एकमेकांचा जीव घेतील”, भर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे दोन गट भिडले अन् लाथा-बुक्क्याने केली मारहाण, VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या खूप गाजतोय. या व्हिडीओत नवरात्रोत्सवात एका ठिकाणी गरबा सुरू आहे. अनेक जण एकसारख्या स्टेप करीत गरबा खेळण्यात मग्न आहेत. पण या व्हिडीओत लक्ष मात्र काकांनी वेधून घेतलं आहे. हाय रे हाय तेरा ठुमका या गाण्यावर काका जबरदस्त गरबा स्टेप करताना दिसत आहेत. अगदी जोशात आणि जल्लोषात ते गरबा खेळताना दिसतायत. काकांची एनर्जी पाहून अनेकांनी त्यांचं कौतुकदेखील केलं आहे.

हा व्हायरल व्हिडीओ @_kokani_suhas121 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “कशी आहे स्टेप” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला सात लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. एका गावातील हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… “देशी दारू अशी चढली की…”, सरकत्या जिन्यांवर काकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “दिवस पाचवा नाही, पेग पाचवा आहे” तर दुसऱ्याने “देशी पॉवर” अशी कमेंट केली. तर एक जण म्हणाला, “एकपण बीट मिस नाही होणार, डोन्ट अंडरएस्टिमेट काकांचा ठुमका” तसंच “काका फुल जोशमध्ये आहेत”, “९० लय झाली काय”, “९० पॉवर “, “दारूडा गरबा”, “देशी स्टाईल” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, याधीही नवरात्रीत गरबा खेळणाऱ्यांचे असेच अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात महिला चक्क ट्रेनमध्येच गरबा खेळल्यात. तर, एका आजीने आपल्या स्टेप्सनी नेटकऱ्यांना चकित केले.