Dance Video: सोशल मीडियावर सध्या स्क्रोल करता करताच हजारो डान्सचे व्हिडीओ समोर येतात. आपली कला सादर करण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकांचे रील्स तर अशाप्रकारे व्हायरल होतात की त्यांचा एक ट्रेंडच तयार होतो.

काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘माझ्या प्रेमाची आवड जुली तुला’, ‘दिल्ली से मनाली’, ‘तेनू शरारत दिखावा’, ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. या गाण्यांवर अनेक कलाकारांनी, सोशल मीडिया स्टार्स आणि अनेकांनी रील्स करत, डान्स करत व्हिडीओज अपलोड केले, जे व्हायरल झाले. पण सध्या एक मराठी गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय, जे म्हणजे ‘वेड लावलं’. सध्या या गाण्यावर अनेकांनी डान्स करत रील्स बनवल्या आहेत. अशातच एका कुटुंबाच्या या गाण्यावरील डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कुटुंबाने असं नेमकं काय केलं आहे, ते जाणून घेऊ या…

वेड लावलं डान्स व्हायरल

वेड लावलं या गाण्यावर नवरा बायको आणि सासू, सासऱ्यांनी धम्माल डान्स केला आहे. डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप गाजला आहे. त्यांची ऊर्जा, उत्साह आणि स्टेप्स इतक्या अचूक होत्या की हा डान्स जिने केला आहे, त्या यशश्रीनेदेखील या व्हिडीओवर कमेंट केली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक नवरा बायको, सासू सासरे वेड लावलं या गाण्यावर थिरकताना दिसतायत. यातल्या प्रत्येकाचीच एनर्जी आणि स्टेप्स इतक्या भारी आहेत की त्या बघूंन नेटकऱ्यांनी अक्षरश: कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या गोड कुटूंबाने सध्या सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @trailsandtastes_together या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १.५ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “मम्मीच्या डान्सने वेड लावलं” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काका डान्सर होते का… अप्रतिम”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “सुखी परिवार आहे कोणाची नजर नको लागून दे देवा”, तर तिसऱ्याने “काकू-काका तुम्ही दोघे एकदम छान दिसताय आणि नाचताय” अशी कमेंट केली. तर “सर्वजण खूप छान. काका डान्सर होते का…. परफेक्ट ॲक्शन परफेक्ट” अशी एकाने कमेंट केली.