Viral Video, Vicky Kaushal tauba tauba dance: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओंमध्ये डान्स व्हिडीओंचं प्रमाण जरा जास्तच आहे. डान्स करताना अनेक जण मजेशीर पद्धतीने त्यात ट्विस्ट आणतात खरा, पण काही जण फक्त व्हायरल होण्यासाठी हा प्रकार करतात आणि प्रचंड ट्रोल होतात.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकाल इन्फ्लुएंसर कोणत्याही थराला जातात. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे किंवा विक्षिप्त डान्स करत लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळं सर्रास सुरू असतं.

हेही वाचा… विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; विद्यापीठात दोघांनी केलं किस अन्…, VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

गेल्या काही महिन्यांपासून विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. अनेक इन्फ्लुएंसर, कलाकार या गाण्यावर थिरकताना दिसतायत. या गाण्याची डान्स स्टेप करण्यासाठी थोडी कठीण आहे असं म्हणता येईल, पण यावर थिरकण्यासाठी अनेकांनी अगदी जीवाचं रानचं केलंय. या डान्सवर आता एक महिला थिरकली आहे. तिच्या डान्सचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… माणुसकीचा अंत! दुचाकीस्वाराच्या चाकाखाली चिरडलं श्वानाचं पिल्लू; धक्कादायक VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला विकी कौशलच्या तौबा तौबा गाण्यावर डान्स करताना दिसतेय. तिच्या डान्स स्टेप्स पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. साडी नेसून सगळी एनर्जी त्या एका डान्स स्टेपवर लावून ही महिला थिरकताना दिसतेय.

https://www.instagram.com/reel/C-HYi8bRi_y/?igsh=Z2c5YmpvbWdkejNv

हा व्हिडीओ ‘lucky.divyanshuhttpsyoutube.co’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळातच या व्हिडीओला १.१ मिलियन व्ह्यूज आले असून याला सात हजारांपेक्षा जास्त लाइक्स आले आहेत.

हेही वाचा… डान्स VIDEO शूट करताना मागून हवेच्या वेगाने आली बाईक अन्…, पुढे तरुणीबरोबर ‘जे’ काही घडलं ‘ते’ पाहून व्हाल थक्क

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Commments)

महिलेचा हा डान्स व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलंय. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हा टॅलेंट तुला देवाने दिला आहे, कृपया तू तो देवाकडे परत दे”; तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “बसं कर, तू नाचतेयस आणि चक्कर मला येतेय.” तर एक जण म्हणाला, “डान्स करता करता आता दिवाळामध्ये घुसाल.”