Woman dances on moving car viral video: आजकाल सोशल मीडियावर थोड्या वेळात व्हायरल होणारे व्हिडीओ लोकांचे लक्ष पटकन वेधून घेतात. इन्स्टाग्राम रील्स, इतर शॉर्टस आणि काही खासगी क्षण किंवा धमाकेदार ट्रिक्स शेअर करून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेताना यामध्ये काही वेळा मनोरंजन आणि कौशल्य दाखवण्याचा उद्देश असतो; तर काही वेळा लोक अति धाडस किंवा खतरनाक स्टंट करून फक्त लाइक्स आणि व्ह्युज मिळवण्याकडे लक्ष देतात. सोशल मीडियाच्या या जगात, काही घटना धोकादायक आणि चर्चेचा विषय बनतात.

नवी मुंबईच्या खारघर परिसरात नुकतीच अशीच एक घटना घडली, जिच्या परिणामी फक्त सोशल मीडियावरच नव्हे, तर स्थानिक नागरिकांमध्येही चिंता आणि संताप निर्माण झाला.या व्हिडीओमध्ये खारघर भागातील रस्त्यावर एक तरुणी रीलसाठी कारच्या बोनेटवर नाचताना दिसली. एक मुलगा गाडी चालवत होता; परंतु पोलिसांनी तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. तरुणी गाडीवर नाचत असताना रस्त्यावर इतर वाहनं चालत होती, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती.

पाहा व्हिडीओ

काही सेकंदांचा हा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनचालक या स्टंटमुळे घाबरले, कारण- अशा धोकादायक क्रियांमुळे फक्त स्वतःच्या नव्हे, तर इतरांचा जीवही धोक्यात येऊ शकतो. नवी मुंबई पोलीस यांनी त्वरित कार थांबवली आणि आरोपी युवकाला ताब्यात घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, युवकाविरुद्ध सार्वजनिक सुरक्षिततेची खिल्ली उडवणे आणि धोकादायक वाहन चालवण्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

या घटनेवर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी या प्रकारला मनोरंजन म्हणून मजा केली; पण काही लोकांनी या स्टंटवर राग व्यक्त केला आहे. “फक्त लाइक्ससाठी जीव धोक्यात घालणं योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. पोलीस प्रशासनानेही या प्रकारावर कारवाई करावी, असं म्हटलं आहे. त्यामुळे इतर तरुणांना अशा धोकादायक स्टंटपासून दूर राहण्याचा संदेश मिळेल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.