Dance Video: सोशल मीडियावर एखादं गाणं व्हायरल झाला की त्यावर डान्स करण्याचा मोह अनेक क्रिएटर्सना होतो. मग अगदी लहानांपासून, मोठ्यांपर्यंत अनेकजण हा ट्रेंड फॉलो करत व्हायरल गाण्यावर थिरकताना दिसतात. तर अनेकदा एखाद्या कार्यक्रमात, समारंभात, हळदीत, लग्नात केलेले डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात तर काही डान्स वादग्रस्तदेखील असतात. अशा या डान्सच्या भोवऱ्यात दररोज काही ना काही नवनवीन पाहायला मिळतं.

सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ व्हायरल झाला की रातोरात त्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आणि अशा क्रिएटर्सच्या चाहत्यांची संख्याही वाढते. सध्या एका महिलेचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात अनेकांनी तिला गौतमी पाटीलबरोबर तिची तुलना केली आहे. ही महिला नेमकी आहे तरी कोण आणि हीचा डान्स का व्हायरल होतोय, जाणून घेऊया…

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात काही महिला डान्स करताना दिसत आहेत. मात्र, त्यामध्ये एका महिलेच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या राजा हिंदुस्थानी या बॉलीवूड चित्रपटातील प्रसिद्ध गाणं ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्यावर ही महिला थिरकताना दिसत आहे. एक्सप्रेशन्स, मोहक अदा आणि जोशात डान्स करत तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. तिचा मनमोहक डान्स आणि जबरदस्त एनर्जी पाहून अनेकांनी तिला थेट ‘गौतमी पाटील’लाही टक्कर देणारी डान्सर असल्याचं म्हटलं आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @deep.ikayadav9408 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.३ मिलियन व्ह्युज आले आहेत. तर “माझ्या या व्हिडीओवर इतकं प्रेम करण्यासाठी सगळ्यांना धन्यवाद ” असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “२५ वेळा बघितलं तरी मन भरत नाहीये”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आग लावून टाकली”, तर तिसऱ्याने “कडक एक्सप्रेशन्स” अशी कमेंट केली. तर “गौतमी पाटीलला टक्कर देईल” अशी एकीने कमेंट केली.