scorecardresearch

VIRAL VIDEO : भररस्त्यात मुलीने डिलिव्हरी बॉयला चपलीने मारलं, जे सोडवायला आले त्यांनाही तिने…

या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओमध्ये ही मुलगी डिलिव्हरी बॉयला चक्क चपलीने मारत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. या डिलिव्हरी बॉयचा दोष एव्हढाच होता की….

delivery-boy-beaten
(Photo: Twitter/ sirajnoorani )

एक फूड डिलीव्हरी बॉयला मुलीने भररस्त्यात बेदम मारहाण केल्यानं एकच खळबळ उडाली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. या व्हिडीओमध्ये ही मुलगी डिलिव्हरी बॉयला चक्क चपलीने मारत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. या डिलिव्हरी बॉयचा दोष एव्हढाच होता की त्याच्या बाईकची मुलीच्या स्कूटीसोबत टक्कर झाली. यानंतर मुलीने रागाच्या भरात भररस्त्यात डिलिव्हरी बॉयला चपलीने मारहाण करण्यास सुरुवात केली. एव्हढंच नव्हे तर तिने त्यासा अनेक वेळा लाथा मारल्या. मदतीसाठी आलेल्या लोकांसोबतही तिने असभ्य वर्तन केलेलं दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी भररस्त्यात एका डिलिव्हरी बॉयला मारहाण करत आहे. यादरम्यान लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला खरा. पण ही मुलगी लोकांना सुद्धा ऐकत नव्हती. ती भांडण सोडवायला आलेल्या लोकांवरच ओरडली आणि म्हणाली, ‘मला दुखापत झाली आहे, तुम्हाला नाही…’ बराच वेळ समजवून सुद्धा ही मुलगी शांत होत नव्हती. अखेर हे प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. डिलिव्हरी बॉयसोबत संवाद साधल्यानंतर मुलीविरुद्ध ओमटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ही मुलगी स्वतः स्कूटी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या समोर आली आणि तोल बिघडल्याने पडल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : चित्ता शिकारीसाठी आला असताना हरणाने अशी उडी घेतली की…, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बालकामध्ये हनुमानाचा अवतार दिसला, पाहण्यासाठी लोकांनी केली गर्दी, पाहा VIRAL VIDEO

दिलीप विश्वकर्मा (२५) असे डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. हा युवक नताल चरागणवा येथील रहिवासी आहे. ही घटना घडली तेव्हा डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले जात आहे. @sirajnoorani नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे प्रकरण चर्चेत आलं. हा व्हिडीओ पाहून तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकात जाईल. काही युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट करत मुलीच्या वर्तनावर आपला राग व्यक्त केलाय. तर काही युजर्सनी तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of woman who beats delivery boy with shoes in madhya pradesh jabalpur see what happened then omg news prp

ताज्या बातम्या