Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओंमध्ये डान्स व्हिडीओंचं प्रमाण जरा जास्तच आहे. डान्स करताना अनेक जण मजेशीर पद्धतीने त्यात ट्विस्ट आणतात आणि लगेच व्हायरल होतात.

गेल्या काही महिन्यांपासून ‘मन धावतंया तुझ्याचसाठी’, ‘झटपट पटापट’, ‘स्वर्गात आकाशगंगा’ अशी गाणी व्हायरल होत आहे. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. पण, सध्या एका काकींचा डान्स खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. कोणतंच ट्रेंडिंग गाण नाही पण त्यांनी जो डान्स केलाय आणि त्याहीपेक्षा यामधून जे मांडण्याचा प्रयत्न केलाय ते पाहून सगळीकडेच त्यांची चर्चा आहे. नेमकं त्यांनी असं काय केलंय जाणून घेऊ या…

काकींचा डान्स व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला बॉलीवूडचं गाणं ‘एक उचा लंबा कद’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. ती अगदी बेभान होऊन डान्स करते. तसंच तिला ट्रोल करणाऱ्या, नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिलंय. आनंदी राहायला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते खरंय. हेच या महिलेने खरं करून दाखवलंय. मी या वयातही मला हवं तसं वागू शकते हवं ते करू शकते असं या महिलेचं म्हणण आहे आणि तिने ते डान्सच्या स्वरूपात मांडलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @archanabhuyar026 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “तुमचं वय झालं आता शोभत नाही. तुम्ही ४ लोक मी मेल्यावर माझ्या मरणात उडी नाही मारणार. मला हवं तसंच जगणार मी. निघा.” अशी कॅप्शन या व्हिडीओला देत या काकींनी सगळ्यांचं तोंड बंद केलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल 559k व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

काकींच्या डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काकींनी सगळ्यांची बोलतीच बंद केली”, तर दुसऱ्याने “कौतुक करावे तेवढे थोडंच आहे” अशी कमेंट केली.