scorecardresearch

VIRAL VIDEO : दबंग लेडी….एका हातात पिस्तुल, दुसऱ्या हातात काठी घेऊन फिरत होती, कारण ऐकून हैराण व्हाल!

आतापर्यंत तुम्ही दबंगगिरी करणारे पुरूषच पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर दबंग महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिलेने तिच्या एका हातात पिस्तुल तर दुसऱ्या हातात काठी पकडलेली दिसून येतेय.

Dabang-Lady-Viral-Video
(Photo: Twitter/ VineetTiwari01 )

Dabang Women Video: ग्रामिण भागात बहुतेक करून दबंगगिरीचे वेगवेगळे उदाहरण आपल्याला पहायला मिळत असतात. दबंगगिरी करणारे हे लोक स्वतः सगळ्यांपेक्षा जास्त ताकदवान समजतात आणि त्यांना कायद्याची सुद्धा भीती नसते. आतापर्यंत तुम्ही दबंगगिरी करणारे पुरूषच पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर दबंग महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिलेने तिच्या एका हातात पिस्तुल तर दुसऱ्या हातात काठी पकडलेली दिसून येतेय. दिवसाढवळ्या ही महिला पिस्तुल आणि काठी घेऊन फिरताना दिसून येतेय. ही महिला कुणाला मारण्यासाठी जातेय का, असा भास हा व्हिडीओ पाहून होतोय. पण पुढे जे कारण दिसून आलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला गावात फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिने सलवार-कमीज घातला आहे. यासोबतच तिने गळ्यात स्कार्फही घातला आहे. तिच्या एका हातात काठीही दिसत आहे. व्हिडीओमध्ये नीट पाहिल्यास तिच्या हातात पिस्तूलही असल्याचं लक्षात येईल. ती गावाच्या रस्त्यावरून चालताना दिसून येतेय. चालत असताना ती पिस्तुलही कमरेला लावण्याचा प्रयत्न करते. त्या महिलेच्या आजूबाजूला दुसरे कोणी दिसत नाही. महिलेची ही दबंग स्टाइल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : Ratan Tata News: टाटा नॅनोमध्ये बसून VVIP ट्रिटमेंट न घेता रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : इथे आहे जगातील सर्वात मोठा माठ, किती पाणी भरत असेल यात? पाहा VIRAL PHOTO

रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ यूपीच्या हमीरपूरच्या मौदाहा कोतवाली अंतर्गत येणाऱ्या कमहरिया गावचा आहे. या व्हायरल व्हि़डीओमधल्या महिलेचं नाव शहनाज असं आहे. ही महिला गावातील रस्त्यावरून जात असताना तिथल्या नागरिकांनी तिचा हा व्हिडीओ शूट केला आहे.

हा व्हिडीओ विनीत तिवारी नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या नजरेत तो पडला आणि पोलिसांनी तपास सुरू केला. तपासासाठी पोलीस त्या महिलेच्या घरी देखील पोहोचले.

आणखी वाचा : राहुल द्रविडच्या साधेपणावर फिदा झाले फॅन्स, बुक लॉंचच्या कार्यक्रमात शेवटच्या रांगेत बसलेला फोटो VIRAL

महिला कुणाला मारायला जाते की काय असा भास हा व्हिडीओ पाहून होऊ लागतो. पण या व्हिडीओमागचं प्रकरण वेगळंच निघालं. पोलिसांनी या महिलेकडून पिस्तुल जप्त केले असून ते बनावट असल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे. खरं तर, हे तिच्या हाततले पिस्तुल नव्हे तर ते एक लायटर आहे जे पिस्तुलासारखे दिसते. तपासादरम्यान आणखी एक आश्चर्यजनक माहिती कळली की महिलेच्या घरात एक म्हैस घुसली होती. त्या म्हशीला हाकलण्यासाठी ती आपल्या हातात काठी घेऊन बाहेर पडल्याचे निष्पन्न झाले. यादरम्यान गावातील काही लोकांनी तिचा व्हिडीओ बनवला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of women having pistol and stick in hands in hamirpur see viral video prp

ताज्या बातम्या