scorecardresearch

जीव मुठीत घेऊन मुंबई लोकलमध्ये चढणाऱ्या महिलांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; सुरक्षेच्या मुद्यावरून पेटला नवा वाद

शहराच्या लोकल ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्यांसाठी चालत्या ट्रेनमधून चढणे आणि उतरणे हे एक सामान्य गोष्ट आहे परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे धोकादायक प्रवासावर प्रकाश टाकला आहे.

women rushing to get into moving Mumbai local train
लोकलमध्ये चढण्यासाठी महिलांच कसरत (फोटो – ट्विटर /एक्स, अक्षय करातिया)

मुंबईतील लोकलचा प्रवास म्हणजे मोठी कसरतीचं काम आहे. प्रंचड गर्दीमध्ये प्रत्येकाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दरम्यान सध्या
मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलांच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत वाद सुरू झाला आहे. शहराच्या लोकलने रोज प्रवास करणाऱ्यांसाठी चालत्या ट्रेनमधून चढणे आणि उतरणे हे एक सामान्य गोष्ट आहे परंतु व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे धोकादायक प्रवासावर प्रकाश टाकला आहे.

एक्स यूजर अक्षय करातियाने शेअर केलेल्या, व्हिडीओ २ दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि व्हिडीओसह ‘ये है बॉम्बे मेरी जान’ हे गाणे वाजत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कशा प्रकारे महिला गर्दीमधून कसरत करून रेल्वेच्या डब्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावार काटा येऊ शकतो.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या काहींनी असे प्रवास करण्यामागचे कारण सांगिले. एकजण म्हणाला की, ‘ प्रवाशांकडे ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करण्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांना घरी परतण्याच्या लांबच्या प्रवासासाठी गर्दीत उभे राहून धक्काबुक्की सहन करावी लागणार नाही.”

हेही वाचा – संपत आलेल्या सॉसच्या बाटलीमधून सॉस कसा काढावा बाहेर? तरुणीने केला भन्नाट जुगाड; पहा Viral Video

“कोणतीही ट्रेन स्टेशनवर थांबते तेव्हा सर्व जागेवर प्रवासी बसलेले असतात. ऑफिसमध्ये दिवसभर काम केल्यानंतर, गर्दीच्या ट्रेनमध्ये २.५ तास उभे राहून प्रवास करणे कठीण आहे. यापैकी ७५ टक्के महिला कामावरून जातात हे विसरू नका. पुन्हा काम करण्यासाठी घरी जातात,” गोल्डन सनराइज (@Divinelove11550)नावाच्या अकाउंटवरून कमेंट केली.

प्रिया यादव (@PriyaaReturnz) म्हणाली, “बर्‍याच स्त्रिया ट्रेनमध्ये भाजी कापण्यासाठी, वेळ वाचवण्यासाठी या प्रवासाचा वेळ वापरतात. नाव ठेवणे सोपे आहे, या महिलांच्या जागी स्वत:ला ठेवून तुम्हाला याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. विशेषतः मुंबईतील मध्यमवर्गीयांसाठी जीवन सोपे नाही.

हेही वाचा – मुलांची उंची आणि एकाग्रता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ योगासने; आजपासून करा सुरुवात

काही लोकांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रकाश टाकला आहे

“एकदा, मी लोकलमध्ये प्रवास करत होते आणि एका प्रवाशाला ‘ट्रेन थांबल्यावर उतरणार की काय, असे म्हणताना ऐकले? मी अजूनही कधी कधी याचा विचार करते,” असे आयुषी गुप्ता (@Aaayushiiiiiii) यांनी लिहिले.

“मासिक २० हजारांच्या नोकरीसाठी ही सगळी घाई. केवळ ३३३ रुपयांसाठी कोणीही आपला जीव धोक्यात घालू नये,” वैभव जैन (@1997indian) असे मत व्यक्त केले

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 17:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×