Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धी किंवा स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक कधी घरी तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवरदेखील डान्स करताना आपल्याला दिसतात.
असं म्हणतात कला सादर करण्याचं कोणतंच वय नसतं. आणि ते आतापर्यंत अनेकांनी पाहिलंदेखील आहे. सध्या हीच कला एका चिमुकलीने अतिशय सुंदर पद्धतीने सादर केली आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल…
व्हायरल व्हिडीओ (Dance Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची सुरुवात एका चिमुकलीच्या जबरदस्त एन्ट्रीने होते. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, चिमुकली नऊवारी साडी, नथ, गजरा इतकंच नाही तर घुंगरू घालून सुंदर लावणी नृत्य सादर करत आहे.’चढविला पट्टा कमरेवरी’ या मराठी गाण्यावर चिमुकली स्टेजवर धमाकेदार परफॉर्मन्स करताना दिसत आहे. ही चिमुकली अगदी उत्तम नृत्य सादर करताना दिसत आहे. या चिमुकलीचा डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांनी तिच्या या डान्सचं खूप कौतुकदेखील केलं आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @marathi_orchestra_alibaug01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘डान्स आवडला तर नक्की फॉलो करा…., अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २.४ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, “दिल खुश परफॉर्मन्स ”. दुसऱ्याने, “कौतुक करावं तेवढं कमी, बेस्ट लेकरा”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करत म्हणाला, “येकच नंबर, ही आहे महाराष्ट्राची खरीखुरी लावणी”. एकाने, “याला म्हणतात महाराष्ट्राची खरी लोककला खूप सुंदर”, अशी कमेंट केली. कौतुक कराल तेवढे कमी कारण या छोट्याशा बाळाच, Expressionss एक नंबर, अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.
