Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही थक्क करणारे असतात तर काही धक्कादायक. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुण चालत्या कारच्या छतावर मद्यपान आणि पुश-अप्स करताना दिसत आहे. दिल्लीच्या एनसीआर सेक्टरमध्ये दररोज असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ गुरुग्राम येथील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या कारच्या छतावर पुश-अप्स करताना दिसत आहे तर कारमधील त्याचे बाकीचे मित्र कारच्या खिडकीतून बाहेर डोकावत जोरजोराने ओरडत असताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार घडत असताना तेथीलच एका दुसऱ्या प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला होता. हेही वाचा : भर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारचालकावर दंड ठोठावला आणि कारही जप्त केली. या प्रकरणावर बोलताना वाहतूक पोलीस उपायुक्त वीरेंद्र म्हणाले की अशी कृत्ये कधीही खपवून घेतली जाणार नाहीत.प्रदीप दुबे नावाच्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील कृत्य पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहे.