Premium

Viral Video : चालत्या कारच्या छतावर तरुणांची हुल्लडबाजी, मद्यपान आणि पुश-अप्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा पुढे काय झालं?

या व्हिडीओमध्ये चार तरुण चालत्या कारच्या छतावर मद्यपान आणि पुश-अप्स करताना दिसत आहे.

Viral Video of youngsters drinking alcohol and doing push ups on roof of the moving car
(Photo : Twitter)

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही थक्क करणारे असतात तर काही धक्कादायक. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चार तरुण चालत्या कारच्या छतावर मद्यपान आणि पुश-अप्स करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या एनसीआर सेक्टरमध्ये दररोज असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ गुरुग्राम येथील आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या कारच्या छतावर पुश-अप्स करताना दिसत आहे तर कारमधील त्याचे बाकीचे मित्र कारच्या खिडकीतून बाहेर डोकावत जोरजोराने ओरडत असताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार घडत असताना तेथीलच एका दुसऱ्या प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला होता.

हेही वाचा : भर मांडवातून नवरी पळाली अन् तेरा दिवस नवरदेव…; वाचा एका लग्नाची अनोखी गोष्ट

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारचालकावर दंड ठोठावला आणि कारही जप्त केली. या प्रकरणावर बोलताना वाहतूक पोलीस उपायुक्त वीरेंद्र म्हणाले की अशी कृत्ये कधीही खपवून घेतली जाणार नाहीत.
प्रदीप दुबे नावाच्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील कृत्य पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of youngsters drinking alcohol and doing push ups on roof of the moving car in the gurugram city ndj

First published on: 31-05-2023 at 12:10 IST
Next Story
Viral video: वाघासोबत तरुणीचं फोटोशूट, सुरुवातीला शांत बसला काही क्षणातच…