Office Viral Video : सोमवार म्हणजे अलार्मशी युद्ध सुरू करण्याचा दिवस आणि शुक्रवार म्हणजे ऑफिसही पिकनिकसारखं वाटण्याचा दिवस. कारण एकच की,“पुढचे दोन दिवस विकली ऑफ” असतो. त्यामुळे सुट्टी असणार ही भावना माणसाला वेगळी ऊर्जा देऊन जाते, पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. हे पाहून तुम्हाला कोणताही दिवस असो रोज ऑफिसला जाण्याची इच्छा नक्कीच होईल. नक्की या ऑफिसमध्ये असं त्यादिवशी काय घडलं जाणून घेऊया बातमीतून.
आपण सकाळी लवकर उठल्यावर सगळ्यात आधी अंघोळ करून देवापुढे दिवा लावतो. सकाळची वेळ पुजा करण्यासाठी श्रेष्ठ असते, कारण झोपेतून उठल्यानंतर आपले मन शांत आणि स्थिर असते. डोक्यात कोणतेही विचार नसतात. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतील ऑफिसमध्येही ही पद्धत फॉलो करण्याचे ठरवले आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सकाळी ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी आल्यानंतर देवाची आरती करून दिवसाची सुरुवात करण्यात आली. एक व्यक्ती देवासमोर आरतीचे ताट घेऊन उभा राहतो आणि इतर कर्मचारी मागे उभं राहून आरती म्हणतात आणि टाळ्या वाजवताना दिसतात, जेणेकरून दिवसाची सुरुवात शांत आणि स्थिर मनाने झाली.
नको वाटणारं ऑफिस देखील हवं हवसं वाटेल (Viral Video)
ऑफिसमध्ये सकाळची सुरुवात प्रत्येकाची जवळपास सारखीच असते. डेस्क साफ करणं, लॅपटॉप सुरू करणं आणि कामाला सुरुवात करणं. त्यानंतर नाश्ता, मित्र-मैत्रिणींशी गप्पा आणि थोडी मजामस्ती यामुळे दिवस हलकाफुलका होतो. व्हायरल व्हिडीओतील ऑफिस नेमकं कोणतं आहे, हे अजून समोर आलेलं नाही. पण, या भन्नाट आणि हटके कल्पनेने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा ऑफिसचा हा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @a_break._ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जर दिवसाची सुरुवात अशी होणार असेल तर नको वाटणारं ऑफिस देखील हवं हवंसं वाटतं” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून कॅप्शनवर सहमती दर्शविताना आणि ही कल्पना आवडली असे इमोजीद्वारे सांगताना व्हिडीओच्या कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत. तुमच्याही ऑफिसची सुरुवात अशीच व्हावी असं तुम्हाला वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा…
