Viral Video: देशभरातील अनेक ठिकाणी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नुकताच (काल) नागपंचमी सण पार पडला. यानिमित्ताने अनेक महिला उपवास करून नागाची मूर्ती घरी आणून त्याची पूजा करतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. पूर्वी काही ठिकाणी नागपंचमीला जिवंत नागांची पूजा केली जायची. अशा विविध प्रथा-परंपरा आजपर्यंत आपण पाहत किंवा ऐकत आलो आहोत. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एखाद्या सापाचा नुसता फोटो पाहिला तरी अनेकांना घाम फुटतो. नाग, मण्यार, अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात, यात काही नवल नाही. सोशल मीडियावर या विविध जातींच्या सापांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. नागपंचमीच्या दिवशी असे व्हिडीओ आणखी चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये काही तरुणांनी नागपंचमीला चक्क जिवंत नागाला पकडून त्याच्याबरोबर असं काहीतरी केलं, जे पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका डोंगराळ परिसरात काही तरुण मुलं उभे असून त्यातील सर्पमित्र असलेला एक तरुण नागाच्या जवळ उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी नागासमोर केक ठेवण्यात आला असून सर्व जण नागाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत टाळ्या वाजवत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @reel_star_muttu या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत 8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: ‘शायनिंग मारणं जीवावर बेतलं…’ रील बनवण्याच्या नादात तरुणाचा डोंगरावरून पाय घसरला; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘लाइक्सच्या नादात..’ पाहा व्हिडीओ: https://www.instagram.com/reel/C-aF3vKP3CW/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== युजर्सच्या कमेंट्स चर्चेत एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “इंडिया इज नॉट बिगनर्स”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “या भावांचे यम राजासोबत चांगले संबंध आहेत”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “याच कारणामुळे महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हा केक सगळ्यांनी खायला हवा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, "समाजात खूप विचित्र लोक आहेत."