scorecardresearch

चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL

हा पोपट परदेशी पोपट आहे, जो आता हिंदीत बोलतोय. या व्हिडीओमध्ये तो एका महिलेला आई म्हणून हाक मारतोय. तसंच तिच्याकडे चहाची मागणीही करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे.

Parrot-Video-Viral
(Photo: Twitter/ ipskabra)

पोपट हा अतिशय सुंदर आणि बुद्धिमान पक्षी आहे. तो कोणाचाही आवाज कॉपी करण्यात माहिर असतो. अनेकांच्या घरात तुम्ही पोपट पाहिला असेल, घरी एखादा नवा पाहूणा आला की अनेक प्रकारचा आवाज काढतो आणि पोपटाचा हा आवाज ऐकून प्रत्येकजण मंत्रमुग्ध होतो. आता पुन्हा एका पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा पोपट परदेशी पोपट आहे, जो आता हिंदीत बोलतोय. या व्हिडीओमध्ये तो एका महिलेला आई म्हणून हाक मारतोय. तसंच तिच्याकडे चहाची मागणीही करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पोपटाचा रंग किती सुंदर आहे हे पाहायला मिळत आहे. सहसा तुम्ही हिरवे पोपट पाहिले असतील, पण या व्हिडीओमध्ये लाल आणि हिरव्या रंगाचा एक पोपट दिसत आहे जो हिंदीत बोलून एका रात्रीत चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये तो एका महिलेला आई म्हणून हाका मारतोय आणि त्याचवेळी चहा मागतो आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : क्या बात है! स्कायडायव्हिंग करताना उंच आकाशातून आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल

पोपटाहा हा आवाज ऐकून महिला बाहेर येते आणि त्याच्यासोबत बोलू लागते. दोघांमधील हा संवाद लोकांच्या मनाला भिडणारा आहे. हा व्हिडीओ लोकांना फारड आवडू लागलाय. असे पोपट इंडोनेशियामध्ये आढळतात. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, पोपट महिलेला हाक मारताच ती म्हणते, ‘मी चहा घेऊन येत आहे.’ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. “जेव्हा कोणीतरी इतक्या जवळून संवाद साधतं तेव्हा बोलण्यात वेगळीच मजा असते. हे सुंदर आणि निरागस संभाषण ऐकून, मला असं वाटतं की आपण सर्व सजीवांशी असं बोलू शकू…” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : नदीत मुलगा अंघोळ करत होता; अचानक इतका साप मोठा आला आणि…पुढे काय झालं, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : लग्नात वहिनीने दीरासोबत केला इतका जबरदस्त डान्स की, नवरी पाहातच राहिली…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो

नागरिकांनी या व्हिडीओ लाईक करत पोपटावरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. प्रत्येक जण या पोपटाचं कौतुक करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या मनाला भिडला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video parrot bird google trends trending video parrot calls mummy and asking tea omg this beautiful video impressed everyone prp