VIDEO : रेकॉर्डिंग सुरु असताना मोबाईल घेऊन उडून गेला पोपट आणि..

पोपटाने रेकॉर्डिंग सुरु असलेला मोबाईल घेत पळ काढला.

viral Video parrot flying with phone

ड्रोनमधून पक्षाच्या डोळ्यांप्रमाणे जमिनीवरील देखावा टिपण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु असतात. कल्पना करा की एका पक्षानेच जमिनीवरील सर्व परिसर टिपला असेल तर… अलीकडेच असा हवेतून जमिनीवरची दृष्य टिपणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका पोपटाचा आहे ज्याने एका मुलाकडून मोबाईल घेऊन पळून काढला. मात्र त्या मोबाईलचा कॅमेरा चालू होता आणि  जेव्हा पोपट आकाशात उडाला आणि एक जबरदस्त व्हिडिओ शूट झाला आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक पोपट एका तरुणाचा मोबाईल घेऊन उडून जात असल्याचे दिसत आहे. हा तरुण पोपटाच्या मागे धावतो पण तोपर्यंत तो त्याच्यापासून दूर जातो. या मोबाईलचा कॅमेरा चालू होता. मोबाईल घेऊन हा पोपट लांबच्या प्रवासाला निघला आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट झाला आहे.

पोपटाचा हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३०,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्विटरवर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने हा पोपट चित्रपट निर्माता बनू शकतो, तो प्रतिभावान आहे असे म्हटले आहे.

दुसर्‍या एका युजरने ‘या व्हिडिओचा सर्वात चांगला भाग म्हणजे तरुणाने आपला फोन कसा परत घेतला हे माहित नाही,’ असे म्हटले आहे. आणखी एका युजरने कोणाला ड्रोनची गरज आहे … आमच्याकडे पर्यावरणपूरक पोपट आहे, असे म्हटले आहे

व्हिडिओमध्ये एक मुलगा पोपटाच्या मागे धावत आहे, ज्याने आपल्या पंजामध्ये मोबाईल पकडला आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसा मोबाईल कॅमेऱ्यात एक मिनिटापर्यंत संपूर्ण परिसराचे विहंगम दृश्य टिपतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video parrot flying with phone abn

ताज्या बातम्या