Passenger Clashes With Cab Driver Viral Video : वाहन चालवताना लोक अनेक प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात; ज्यात सीट बेल्ट न लावता वाहन चालवणे देखील समाविष्ट आहे. पण, अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाला रस्ते सुरक्षेची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे आणि ही माहिती चालकाने त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही दिली पाहिजे. तर हीच माहिती एक कॅब चालक एका महिला प्रवाशाला नम्रपणे सांगायला गेला. पण, त्यांचे महिला प्रवाशांबरोबर जोरदार भांडण झाले.
व्हिडीओमध्ये दोन महिला कॅबमध्ये बसताना दिसतात. त्यापैकी एक महिला पुढच्या सीटवर बसते. नेहमीप्रमाणे प्रवास सुरू करण्यासाठी ड्रायव्हर ओटीपी विचारतो. सुरुवातीला ती महिला चुकीचा ओटीपी देते. त्यानंतर दुसरी महिला योग्य ओटीपी सांगते. त्यानंतर लगेचच, चालकाने पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला नम्रपणे सीटबेल्ट लावण्याची विनंती केली. त्यावर ती म्हणाली, “हो, चला” . त्यानंतर इंग्रजी मध्ये “जोपर्यंत सीटबेल्ट लावला जात नाही, तोपर्यंत तो गाडी पुढे नेऊ शकत नाही, कारण वाहतूक पोलीस दंड आकारू शकतात” असा कॅब चालक म्हणतो.
ती स्त्री वाद घालू लागली आणि म्हणाली, “तुला इंग्रजी येते म्हणून उगाच बढाई मारू नका” असं म्हणत मैत्रिणीकडे वळून कॅब चालकाची लगेच तक्रार करायला सांगितले. तसेच “तुमचं हसणंसुद्धा आम्हाला आवडलं नाही” आणि चुकीचा ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही थोडे घाबरलेले दिसलात. ड्रायव्हर तिला विचारतो की, “तुला असं का वाटतं मी थरथरत आहे” त्यावर ती म्हणते, “मला माहीत नाही, पण तुम्ही थरथरत आहात”. यावर ड्रायव्हर शांतपणे उत्तर देतो की, कदाचित त्याला आरोग्याची समस्या असू शकते. तो म्हणतो, “कदाचित मला बीपीचा त्रास असेल. मी तसाच आहे.”
व्हिडीओ नक्की बघा…
महिला मैत्रिणीकडे बघून “बघा हा काय मूर्खपणा आहे? हा वेडा झाला आहे का?” असे म्हणते आणि तेव्हा वादाला तोंड फुटते. ड्रायव्हरचा आग्रह असतो की, त्याने फक्त नियमांचे पालन केले आहे. तरीही महिला भांडण करणाऱ्यावर अडून “तू स्वतःला सुपरस्टार समजतोस का, तू आमच्यासाठी कॅब ड्रायव्हर आहेस, तू गाडी चालवणार आहेस”, यावर, ड्रायव्हर तिला इच्छा असल्यास राईड रद्द करू हाकता. असे म्हणताच थोड्याच वेळात, दोन्ही महिला गाडीतून खाली उतरतात.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rose_k01 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून “भारतामध्ये अनेकदा असं दिसतं की पैशावरून माणसाची किंमत ठरवली जाते. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, ते स्वतःला मोठं समजतात आणि कमी पैसे असलेल्या लोकांना कमी लेखतात. पण पैसा माणसाला मोठं करत नाही, तर त्याचं वागणं आणि विचारधारा त्याला मोठं बनवते”, “पण ड्रायव्हरने तरी कुठे सीटबेल्ट घातला आहे”, “कॅब ड्रायव्हर स्वतः सीटबेल्ट न लावता विनाकारण हसून गैरजबाबदारपणाच दाखवतो आहे. नियम पाळणे ही त्याचीही जबाबदारी आहे. त्यामुळे महिलांनी जे आक्षेप घेतले, ते पूर्णपणे चुकीचे नव्हते. ड्रायव्हरनेच आधी सुरक्षिततेचे नियम पाळायला हवे होते”, “हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत…
indianexpress.com दिलेल्या वृत्तानुसार व्हिडीओची पडताळणी अद्यापही होऊ शकले नसले किंवा तो कधी आणि कुठे रेकॉर्ड केला गेला याची पुष्टी होऊ शकली नसली तरीही, ही क्लिप मोठ्या प्रमाणावर शेअर केली गेली आहे आणि त्यामुळे ऑनलाइन तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
