सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. कधी प्राण्यांचे रौद्र रूप दाखवणारे तर कधी चक्क डायनोसोरची पिल्ल आढळलेले व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक चकित करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक पेंग्विन पार्किंग असणाऱ्या जागेत आलेले दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक पेंग्विन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वृद्ध महिलेच्या दिशेने चालत असलेले दिसत आहे. हे पेंग्विन या वृद्ध महिलेजवळ जाऊन थांबते आणि त्या दोघांच्या गप्पा सुरू होतात. या दोघांमधील मैत्री तुम्हालाही अचंबित करेल, पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा: नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं
व्हायरल व्हिडीओ:
आणखी वाचा: Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
वृद्ध महिलेच्या हातात असणारी छत्री या पेंग्विनला आवडली असेल किंवा ती छत्री म्हणजे एक पेंग्विन आहे असे वाटल्याने ते वृद्ध महिलेजवळ थांबले असेल, असा अंदाज नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमधील अनोख्या संवादाने नेटकऱ्यांची मनं जिंकली असून, या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.