scorecardresearch

नदीत मुलगा अंघोळ करत होता; अचानक इतका साप मोठा आला आणि…पुढे काय झालं, पाहा हा VIRAL VIDEO

नदीत अंघोळ करण्याची ही इच्छा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. यासाठी सावधान करणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.

Snake-Video-Viral
(Photo: Instagram/ wildistic)

Snake Video: उन्हाळा प्रचंड आहे. उकाड्याने हैराण होऊन अंगाची लाही लाही होत आहे. परीक्षा संपल्याने शाळांना सुट्या आहेत. मेची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुले नदी, विहिरी व तलावात पोहण्यास जात असतात. नदीत अंघोळ करण्याची ही इच्छा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. यासाठी सावधान करणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर काटा उभा राहतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काचेहूनही नितळ असलेली एक निळी नदी दिसून येतेय. या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की ही नदी अगदी काचेसमान दिसून येतेय. या नदीत काही मुले आणि पुरूष अंघोळीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. एक मुलगा नदीच्या किनारी एका दगडावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त आहे. पुढे आपल्यासोबत एक भयंकर घटना घडणार आहे याची त्याला कल्पना देखील नव्हती. आपल्याच धुंदीत असताना या मुलाला आपल्या बाजुने काही तरी हालचाल होत असल्याचा भास या मुलाला होतो. मोबाईलमधून आपली नजर वर काढत तो बाजुला बघतो तर काय…एक भलामोठा साप त्याच्या दिशेने येत होता. हे पाहून या मुलाच्या पायाखालची जमिनच सरकली.

आणखी वाचा : वानर आणि लहान मुलामध्ये रंगली जबरदस्त फाईट, लढाईचा कसा झाला शेवट? पाहा हा VIRAL VIDEO

आपल्याकडे येणारा हा भलामोठा साप पाहून हा मुलगा ताबडतोब दगडावरून उठला आणि नदीबाहेर आला. त्यानंतर या भल्यामोठ्या सापाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करू लागतो. ज्या ठिकाणी हा मुलगा उभा नेमकं त्याच दिशेने हा साप पुढे पुढे येऊ लागतो. हे पाहून हा मुलगा आणखी घाबरतो आणि आपल्या चपला घेऊन दूर पळून जातो. हा किस्सा पाहण्यासाठी खूपच मजेदार आहे.

आणखी वाचा : या पठ्ठ्याने दोन दिवसात बनवले सिक्स पॅक अ‍ॅब्स, विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहाच

या व्हिडीओमध्ये आणखी एक धक्कादायक चित्र दिसतंय. ज्यावेळी हा भलामोठा मुलाच्या दिशेने येऊ लागतो, त्याचवेळी या सापाच्या बाजुला एक पुरूष कूल अंदाजात अंघोळ करताना दिसून येतोय. आपल्या बाजुने एक भलामोठा साप जातोय हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसून आलेली नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! ८६ फुट इतक्या भयंकर लाटा पार करत जर्मन सर्फरने रचला वर्ल्ड रेकॉर्ड

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : लग्नात वहिनीने दीरासोबत केला इतका जबरदस्त डान्स की, नवरी पाहातच राहिली…

हा मजेदार व्हिडीओ wildistic नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करता कमी वेळेत तो व्हायरल देखील झाला. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४.३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक केलंय. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘तिथे उपस्थित असलेल्या निळ्या रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्ती रिअॅक्ट झालाच नाही.’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘मला हा व्हिडीओ फेक वाटतोय. त्या मुलाला सोडलं तर इतर कुणीही रिअॅक्ट झालेलं नाही.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video people were taking a fun bath on the river suddenly big snake attack prp

ताज्या बातम्या